शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिका:यांच्या तीन पानी पत्राने नगरसेवक अवाक्

By admin | Updated: January 16, 2017 00:30 IST

तब्बल 23 सूचना : शहादा पालिका वतरुळात चर्चेचा विषय, गैरवर्तन केल्यास अपात्र करणार !

शहादा पालिका मुख्याधिका:यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांवर आचारसंहिता लावल्याने पालिका वतरुळात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याधिका:यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी दैनंदिन प्रशासन चालविताना वारंवार हस्तक्षेप न करण्याच्या, मंजूर नसलेली कामे न करण्याच्या तसेच बेकायदेशीर व नियमबाह्य ठराव मंजूर केल्यास ठरावाच्या बाजूने मतदान करणा:या सदस्यांना कायदेशीर अडचण ठरू शकते, अशा 23 सूचनांचे तीन पानी पत्रच नगराध्यक्ष व नगरसेवकांना दिले आहे.गेल्या नोव्हेंबर महिन्यात शहादा पालिकेची निवडणूक होऊन 22 डिसेंबर रोजी नूतन नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला होता. या वेळच्या नवीन सदस्यांमध्ये नगराध्यक्षांसह बहुतेक सदस्य नवीन असल्याने त्यांना पालिकेच्या कामकाजाची, प्रशासनाची, नगरपालिका कायद्याची माहिती व्हावी म्हणून            मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांना तीन पानी ‘लखोटा’ पाठवून पालिका नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुख्याधिका:यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना अशा प्रकारची सूचना वजा आदेश          देण्याची शहादा पालिकेतील ही पहिलीच घटना असल्याने पालिका वतरुळात तो चर्चेचा विषय झाला  आहे.मुख्याधिकारी गवळी यांनी सदस्यांना दिलेल्या पत्रात नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी असतात. त्यामुळे दैनंदिन प्रशासन चालविताना पदाधिका:यांनी हस्तक्षेप करणे हे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. पदाधिका:यांनी परस्पर कुठल्याही कर्मचा:यांना अनावश्यक सूचना देऊ नये, मंजूर नसलेली           कामे करण्यास भाग पाडू नये, नगरपरिषदेची कुठलीही सार्वजनिक मालमत्ता राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय हस्तांतर करू नये, पालिकेकडे पुरेसा निधी नसल्यास कुठलेही मंजूर काम करू नये, अशा कडक सूचना मुख्याधिका:यांनी सर्व सदस्यांना केल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी, दुकान भाडे, दुकान डिपॉङिाट व इतर येणी वसूल करण्यास पदाधिका:यांनी अडथळा आणू नये, सदस्यांनी वैयक्तिकरीत्या कुठलेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये. तसेच पालिकेची वाहने व इतर साधन सामग्रीचा वैयक्तिक लाभ घेऊ नये, अशीही सक्त ताकीद मुख्याधिका:यांनी दिली आहे. शहराचे विद्रूपीकरण होईल अशा पद्धतीने दुकाने लावणे, टप:या टाकणे, होर्डिग्ज, बॅनर्स लावणे, अतिक्रमण करणे, सार्वजनिक रस्त्यांना अडथळा आणणे अशा कुठल्याही बाबींना सदस्यांनी प्रोत्साहन दिल्यास अथवा सहकार्य केल्यास त्या सदस्यांचे अपात्रतेबाबत तरतूद असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पालिका सदस्य आपले कर्तव्य बजावत असताना कोणतेही गैरवर्तन केल्यास सदर सदस्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते किंवा पदावरून दूर केले जाऊ शकते, अशा इशारा मुख्याधिका:यांनी या पत्रातून दिला आहे.