शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

उसनवार पैश्यांच्या वादातून अपहरण करत एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उसनवार पैश्याच्या वादातून एकाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली़ यादरम्यान पिडीतावर गावठी पिस्तुल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उसनवार पैश्याच्या वादातून एकाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली़ यादरम्यान पिडीतावर गावठी पिस्तुल रोखून त्याच्याकडील मुद्देमाल लांबवल्याची घटना 9 व 10 मार्च रोजी घडली होती़ अठ्ठी ता़ धडगाव येथील सेल्या दखण्या वसावे (35) हे रावजी भिल यांच्यासह म्हसावद येथे 9 मार्च रोजी कामानिमित्त गेले होत़े यावेळी तेथे मुकेश अजरुन चौधरी रा़ शहादा, जयदेव भिकाजी बागुल रा़ खेतिया, आर्या, दिपक, वासू, अण्णा (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह दोघे जण भेटल़े यातील एकाने सेल्या वसावे यांना दिलेल्या उसनवार पैश्यांची मागणी केली़ दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर सेल्या वसावे हे रावजी भिल यांच्यासह रात्री 10 वाजेच्या सुमारास धडगावकडे जात असताना सर्व संशयित आरोपींनी गाडीचा पाठलाग करत दोघांचे अपहरण केल़े दोघांना गोराडी व म्हसावद शिवारात घेऊन जात बेदम मारहाण केली़ यावेळी संशयितातील एकाने सेल्या वसावे यांना गावठी पिस्तुल दाखवत त्यांच्याकडील सोन्याची चैन, मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेत पहाटेच्या सुमारास सोडून दिल़े मारहाणीत जखमी झालेल्या सेल्या वसावे यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े येथे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे करत आहेत़