शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घराला आग लावून स्वत:ही मारली आगीत उडी, सातपुड्यातील दुर्गम भागातील घटना

By मनोज शेलार | Updated: November 11, 2023 19:12 IST

गंगाराम खुमा वळवी (३०) असे मयताचे नाव आहे. 

नंदुरबार :

तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सिंदुरीचा मोगराबारीपाडा येथे एकाने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील बकऱ्यांसह आपल्या घराला आग लावून स्वतःही उडी घेत आपली राख रांगोळी करून जीवन संपविल्याची हृदय द्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. गंगाराम खुमा वळवी (३०) असे मयताचे नाव आहे. 

अतिदुर्गम भागातील सिंदुरीचा मोगराबारी पाडा येथे वळवी राहतात. रात्री ते एकटेच घरी होते. शुक्रवारी मध्यरात्री घरात असलेल्या पशुधनासह आपल्याच घराला स्वतः पेटवून देत जळत असलेल्या घरात स्वतःने देखील उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. आजूबाजूच्या लोकांना ही बाब समजल्यावर तेथे त्यांनी धाव घेतली. तोपर्यंत घर बेचिराख झाले होते. या हृदय द्रावक घटनेने सातपुड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोलगी पोलिसांना ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेचे नेमके कारण कळू शकलेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे या परिसरातील प्रसिद्ध असलेली "बाहा ही राजा" यांची सालावादाप्रमाणे भरणारी यात्रा रद्द करण्यात आली. त्यांचे पारंपारिक पद्धतीने दरवर्षी होणारे पूजन साध्या पद्धतीने करण्यात आले.