लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरालगत पातोंडा शिवारात दुचाकीने जाणाऱ्या युवकांना अडवत मारहाण करत मोटारसायकली थेट विहिरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजता घडली़ याप्रकरणी मंगळवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अक्षय अनिल वळवी रा़ लहान माळीवाडा, नंदुरबार हा त्याचे मित्र मयूर गणेश माळी, सचिन शाम ठाकरे, भरत ठाकरे व दिपक ठाकरे यांच्यासह पातोंडा गावातील विपुल नामक मित्राला भेटण्यासाठी गेला होता़ दरम्यान रात्री १० वाजता तेथून परत येत असताना पातोंडा येथील पुलाजवळ दोघांच्या मोटारसायकली तीन दुचाकींवर आलेल्या ९ युवकांनी अडवल्या होत्या़ दरम्यान दोघांनी चाकू काढून धाक दाखवत मारहाणीस सुरूवात केली होती़ मारहाण सुरू असतानाच अक्षय याची एमएच ३९ एक्स ०८९४ व मयूर माळी याची विना क्रमांकाची दुचाकी संशयितांनी भेट विहिरीत फेकून दिली़ मारहाण आणि चाकूचा धाक दाखवल्याने चारही युवक या परिसरात रात्री उशिरापर्यंत लपत फिरत होते़याबाबत अक्षय वळवी याने मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर विशाल गावीत, शाहरूख गावीत, मु््न्ना गावीत, मोहन माळी व इतर पाच अनोळखी युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ रात्री उशिरापर्यंत पातोंडा व परिसरातील वसाहतींमध्ये या प्रकाराची चर्चा सुरू होती़ दोघांना डेंगारा आणि हाताबुक्कीने मारहाण करण्यात आल्यानंतर मुका मार लागून दुखापत झाली आहे़मारहाण करण्यात आलेला युवक अक्षय वळवी हा शहरातील एका खाजगी दवाखान्याजवळ चहा दुकान चालवत असल्याची माहिती आहे़ या प्रकाराची रात्री उशिरापर्यंत या परिसरात चर्चा होती़
चौघांना मारहाण करुन दुचाकी फेकली विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:09 IST