अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळातील प्राचार्यपदावरून 'प्रताप'मध्ये वाद झाला. समांतर कार्यकारिणीने प्रभारी प्राचार्य डॉ. एम.बी. चव्हाण यांना पदभार सोडण्याचे आदेश देऊनही त्यांनी ते फेटाळून लावले. तर गोविंद मुंदडे व माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील या दोन्ही गटाच्या कार्याध्यक्षांमध्ये हातघाई झाली. या घटनेमुळे 'प्रताप'चा वाद चव्हाट्यावर आला आहे.
संचालक पुत्र क्रीडा साहित्य चोरी करताना सापडला यावरून प्राचार्य डॉ.एल.ए. पाटील व कार्याध्यक्ष गोविंद मुंदडे तथा संचालकांमध्ये वाद झाला होता. कार्यकारिणीने डॉ.पाटील यांना पदावरून दूर केले होते. न्यायासाठी डॉ.पाटील यांनी १२ जानेवारीपासून अन्नत्याग व मौनवृत्त सत्याग्रह आंदोलन केले. १३ रोजी खा.शि.च्या समांतर गटाच्या बैठकीत संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ.बी.एस. पाटील व सचिव म्हणून प्रा.एस.ओ. माळी यांची नियुक्ती केली. प्राचार्य डॉ.पाटील यांना पूर्ववत पदभार देण्याचा निर्णय घेतला. मगच डॉ.पाटील यांनी उपोषण सोडले.
--------
दोन प्राचार्य नको असे म्हणत आम आदमी पार्टीतर्फे ठिय्या मांडला होता. कार्याध्यक्ष गोविंद मुंदडे यांच्या कार्यालयात कार्याध्यक्ष म्हणून डॉ.बी.एस. पाटील यांनी पदभार घेतला आणि माध्यमासमोर भूमिका मांडत असताना गोविंद मुंदडे हे आले. त्यांनी खुर्चीवर का बसले? असा प्रश्न विचारत डॉ.पाटील यांची कॉलर पकडताच दोघांमध्ये चांगलीच हातघाई झाली. वाजेच्या सुमारास पदभार घेण्यासाठी डॉ.एल.ए. पाटील आले. पाठोपाठ कार्याध्यक्ष डॉ.बी.एस. पाटील हे काही संचालकही आले. त्यांनी चव्हाण यांना तुम्ही डॉ.पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्याचे सांगितले. मात्र चव्हाण यांनी नकार दिल्याने वाद रंगला. विद्यापीठाच्या आदेशानंतर पदभार सोडेल, असे चव्हाण यांनी लिहून दिल्यावर वाद थोडा निवळला.