शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

नंदुरबार जिल्ह्यात हगणदरीमुक्ती राहतेय कागदावरच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:30 IST

जिल्ह्याची स्थिती : अडीच लाख शौचालये बांधून पूर्ण परंतु वापराच्या नावाने बोंब

नंदुरबार/शहादा/तळोदा : महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आह़े प्रत्यक्षात मात्र ही घोषणा केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिल्हाभरात बघायला मिळत आह़े आतार्पयत जिल्हाभरात 2 लाख 31 हजार 835 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आह़े परंतु असे असले तरी याचा कितपत वापर करण्यात येतोय याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आह़ेजिल्हा परिषदेच्या ग्रामीण स्वच्छता विभागातर्फे जिल्हाभरात 2 लाख 31 हजार 835 शौचालयांचे बांधकाम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आह़े तसेच शौचालयांचे 100 टक्के उद्दीष्टपूर्ती झाल्याचेही म्हटले जात आह़े परंतु प्रत्यक्षात असे असूनही ग्रामीण भागातील बहुतेक ग्रामस्थ शौचालयासाठी लोटे घेऊन बाहेर जात असल्याचेच चित्र दिसून येत आह़े नंदुरबार तालुक्यात 40 हजार 617, धडगाव 23 हजार 533, अक्कलकुवा 37 हजार 918, नवापूर 50 हजार 257, शहादा 56 हजार 750 तर तलोदा येथे 22 हजार 760 शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आह़े नंदुरबार शहरातील होळतर्फे हवेली, दुधाळे शिवार आदी परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठय़ा संख्येने नागरिक शौचास बसत असल्याचे दिसून येत़े त्यामुळे हगनदारीमुक्त हा केवळ फार्स आहे की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े शहादाशहादा पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण भागात हागणदारीमुक्तसाठी 101 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 30  हजार शौचालय तयार करण्यात आले आहेत़ परंतु अजूनही 40 टक्के लोक रस्त्याच्या कडेला शौचालयासाठी जात असल्याची स्थिती शहरात आह़े स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात शौचालय योजना सुरु होती़ गावाच्या बाहेर रस्त्यालगत तसेच शेतात बहुतेक लोक शौचाला जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे बहुतेक परिसरात दरुगधीचेही साम्राज्य पसरलेले आह़े  राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत हजारो शौचालयांचे बांधकाम केले असले तरी याचा वापर नागरिक करताय की नाही? याकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आह़े शौचालय बांधकामासाठी लाभाथ्र्याना 12 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येत असत़े परंतु अनेक लाभार्थीसुध्दा केवळ अनुदान मिळवण्यापूर्ती शौचालयाचे प्रस्ताव सादर करीत असल्याचे वास्तव चित्र समोर येत आह़े शहादा तालुक्यात तिखोटा, डोंगरगाले, मोहिदा, सोनवद, असलोद, पिपडे, पिंगाणे, अनरद, लांबोळा, कुकावल, कोठली, वडाळी, सावखेडा, पिंपर्डेसह इतर ग्रामीण भागातसुध्दा रस्त्याच्या कडेला शौचास बसण्याचे प्रकार सुरु आहेत़ याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देत दोषींवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षीत आह़े परंतु केवळ शौचालयाचे बांधकाम झाले म्हणून योजना सफल झाली असा प्रशासनाचा समज होऊन बसला आह़े तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीत सुमारे 30 हजार 531 शौचालय तयार करण्यात आले असल्याची प्रशासनाची माहिती आह़े यात 40 टक्के लाभार्थी शौचालयाचा वापर करत नसल्याची माहिती आह़े तर काही लाभाथ्र्यानी शौचालयाचा वापर  लाकडे, भांडी, शेती अवजारे आदी साहित्यांची साठवणूक करण्यासाठी केला असल्याचे दिसून येत आह़े सावळदा, सजदे, शेल्टी, आडगाव, बहिरपूर, गहाणा, दरा, पिंप्राणी, राणीपूर या भागात आजही रस्त्याच्या बाजूला ग्रामस्थ शौचास बसत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली़ अनेक ठिकाणी शौचालय आहे, परंतु वापरण्यास पूरेसे पाणी नसल्याने ते वापरात आणणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आल़े दरम्यान, शहादा नगरपरिषदअंतर्गत राहणारे लोक गोमाई नदी किनारी, जूना प्रकाशा रोड, भिलाली या भागात शौचास जात आहेत़ खेतिया, चाररस्ता, नवीन भाजी मार्केटलगत, कुकडेल, जूना प्रकाशा रोड या भागात प्रशासनाकडून केवळ दोन वर्षात शौचालये बांधण्यात आलेली               आह़े शहाद्यासह, धडगाव, अक्कलकुवा तसेच नवापूर तालुक्यातसुध्दा अशी परिस्थिती निर्माण झालेली आह़े शौचालय असूनदेखील अनेक लाभार्थी शौचास बाहेर जात असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहेत़ त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करुन स्वच्छ भारत मिशनची  कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आह़े