शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमली नंदनगरी

By admin | Updated: March 15, 2017 23:47 IST

एकत्रित मिरवणूक लक्षवेधी : चौकाचौकात अभिवादनाचा कार्यक्रम, डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

नंदुरबार : शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे, गाण्यांच्या आवाजात आणि सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीने शहर दणाणून गेले होते. शिवजयंतीनिमित्त सकाळपासूनच शहरातील चौकाचौकात उत्साह दिसून येत होता. भगव्या पताका, ङोंडे, कमानी यांनी चौक सजले होते. अनेक मंडळांनी शीतपेय वाटपासह इतर विविध सामाजिक उपक्रमदेखील घेतले.तिथीनुसार शिवजयंती नंदुरबारात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच नाटय़गृह आवारातील शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पालिकेतील, कै.बटेसिंह रघुवंशी व्यापारी संकुल आणि पंचायत समिती आवारातील अर्धपूर्णाकृती पुतळ्यांना विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिवादन केले. चौक सजलेभगव्या पताका, ङोंडे यांच्यासह कमानींनी चौक सजले होते. चौकाचौकात छोटेसे व्यासपीठ उभारून त्यावर शिवरायांची प्रतिमा किंवा पुतळा ठेवून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशाच ठिकाणी काही संघटना, संस्थांनी शीतपेय वाटप व अन्नदानदेखील  केले. युवकांमधील जोश ठिकठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये दिसून येत होता.ठिकठिकाणाहून मिरवणुकाशिवजयंतीच्या मिरवणुका शहरातील ठिकठिकाणच्या चौकातून दुपारी तीन वाजता निघाल्या. मुख्य मिरवणूक सायंकाळी पाच वाजता जुन्या पालिका इमारतीपासून निघाली. सजविलेल्या वाहनावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व पुतळा ठेवण्यात आला होता. विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पक्षांचे पदाधिकारी सहभागीभाजपाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे,  सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक गवते, रोहिदास पवार, हिरालाल मराठे, रवी पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक दीपक दिघे, कुणाल वसावे, किरण रघुवंशी, विलास रघुवंशी, निखिल रघुवंशी, अजरुन सुधाकर मराठे,  नीलेश चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र जैन, गौरव चौधरी, नयन चौधरी, माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, श्याम मराठे,  राम रघुवंशी, पंडित माळी, छोटू माळी, आनंदा माळी आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.प्रतिमा पूजन आणि अन्नदानउड्डाणपुलाच्या शेजारी संभाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त जयेश चौधरी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी पिंटू हटकर, सचिन जाधव, अप्पा बाबर, चेतन सूळ,  सचिन चेवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी 10 वाजता याच ठिकाणी अन्नदान करण्यात आले. सर्वच मंडळांकडून डीजेमिरवणुकीत सहभागी सर्वच मंडळांचे कार्यकर्ते व शिवप्रेमी डीजेच्या तालावर थिरकले. यंदा जवळपास 15 पेक्षा अधिक डीजे लावण्यात आले होते. नंदुरबारातील मिरवणुकांचे मुख्य आकर्षण ढोल व ताशे यांच्या तालावर लेझीम असते. परंतु या वेळी ढोल-ताशे कुठेही दिसून आले नाहीत. केवळ डीजेंचाच निनाद होता.गोफ नृत्यमहालक्ष्मीनगरातील नवयुवक व्यायामशाळेच्या युवकांनी मिरवणुकीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि गोफ नृत्य सादर केले. सकाळी दहा वाजता संदीप चौडे, बिरूभाऊ बडंगर, आकाश फडके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी सोनू शिरसाठ, राहुल पाटील, रोहित साबळे आदी उपस्थित होते.दुचाकींना ङोंडेशहरातील अनेक शिवप्रेमींनी दुचाकींवर राजे शिवाजी यांच्या प्रमितेचे झेंडे लावलेले दिसून येत होते. मिरवणुकीत सामील झालेल्या युवकांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान केलेले होते. अनेक युवक हातात भगवे झेंडे घेऊन शिवरायांचा जयघोष करत होते.पोलिसांचा बंदोबस्तसकाळपासूनच चौकाचौकात तसेच संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. गस्ती पथकातील वाहनेदेखील गस्त घालत होते. सायंकाळच्या मुख्य मिरवणुकीत उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व कर्मचारी मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आले होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस निरीक्षक मोहकर व उपनिरीक्षक शेजवळ यांनी परिश्रम घेतले.