शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील व्यायामशाळा गजबजू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 12:04 IST

संतुलीत आहाराचा सल्ला : जेष्ठ नागरिकांकडूनही मॉर्निग वॉकला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कंनंदुरबार : सध्या नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागली आह़े त्यामुळे आता तरुणांकडूनही आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायामशाळांमध्ये तसेच मॉर्निग वॉकला जाण्यास सुरुवात करण्यात येत आह़े शहरातील विविध व्यायमशाळांमध्ये आता गर्दी दिसू लागली आह़े आरोग्यवर्धनासाठी हिवाळा हा ऋृतु लाभदायक मानला जातो़ मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला भाजीपाला, रसाळ फळे आदींची रेलचेल असत़े शिवाय हिवाळ्यात दोन घासही जरा जास्तच जात असल्याने या दिवसांमध्ये युवकांकडून व्यायामाला सर्वाधिक महत्व देण्यात येत असत़े शहरात मोठय़ा प्रमाणात व्यायामशाळा आह़े त्यातही अनेक युवक सहभागी होत आह़े असे असले तरी शहरातील जगतापवाडी चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणा:या रोडावर मोठय़ा प्रमाणात युवकांसह जेष्ठ नागरिकही मॉर्निग वॉकला जात असल्याचे चित्र दिसून येत आह़े फुटपाथवर लावण्यात आलेल्या व्यायामाच्या साहित्यांचाही उपयोग बहुसंख्य नागरिकांकडून करण्यात येत आह़ेबहुतेक युवकांकडून पहाटे मैदानावर धावण्याचा सरावही करण्यात येत आह़े थंडीत वाढ होत असली तरी युवकांकडून पहाटेच व्यायामासाठी बाहेर पडण्यात येत आह़े हिवाळा लागला असल्याने शहरातील व्यायामशाळा युवकांनी गजबजू लागल्या आहेत़ आरोग्य तज्ज्ञांकडूनही संतुलीत आहार, व्यायामाच्या महत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आह़े युवकांनाही आता व्यायामाचे महत्व कळु लागले असल्याने त्यांच्याकडून व्यायामाला अधिक महत्व देण्यात येत आह़े त्यासोबतच शहरात विविध अत्याधुनिक उपकरणे असलेल्या व्यायामशाळा उपलब्ध असल्याने युवकांना या व्यायामशाळा आकर्षित करीत आहेत़ बहुतेक व्यायामशाळांमध्ये ‘फिटनेस ट्रेनर’ही उपलब्ध आहेत़ ते युवकांना संतुलीत आहार व तंत्रशुध्द व्यायामाबाबतही मार्गर्शन करीत असतात़ त्यामुळे युवकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े अनेक युवकांकडून शरिरसौष्ठवा स्पर्धामध्येही भाग घेण्यासाठी व्यायामशाळांमध्ये कसरत करण्यात येत असत़े त्यातच केवळ हिवाळ्यातच व्यायामशाळेत प्रवेश घेणा:या ‘सिजनेबल’ युवकांचीही आता संख्या वाढत असल्याने व्यायामशाळा गजबजू लागल्या आह़े अनेक व्यायामशाळा या सायंकाळीही सुरु असतात़