शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

जिल्ह्यातील जीम व व्यायामशाळा सुरू होणार पण अटी व शर्तींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.  या ठिकाणी कोविड-१९ संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार  जिम व व्यायामशाळेत येणार्यांनी   सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर वापर करणे  बंधनकारक राहणार असून थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. सर्वांना आरोग्य     सेतू ॲपचा वापर करणे, स्वत:ची  आरोग्य निरीक्षणे करणे व आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक  राहणार आहे.सोशल डिस्टन्सिंग करत उपकरणे किमान ६ फूट तर श्वासाची गती वाढविणाऱ्या व्यायामासाठीच्या उपकरणादरम्यान १२ फूट अंतर राखले जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी जीमचालकांनी संपर्क न येणाऱ्या ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छ हवा आत येण्यास जागा असावी व वातानुकूलन उपकरणांचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे.   दरम्यान स्पा, सौना, स्टीम बाध व जलतरण     तलाव मात्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ६५ वर्षांवरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना जीम , व्यायामशाळेच्या परिसरात व्यायाम करता येणार नाही. जीम, व्यायामशाळा सुरु करणेपूर्वी उपकरण तसेच परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  जीम व व्यायामशाळेत कर्मचारी आणि सदस्य याची संख्या कमीत कमी असावी. सामाजिक अंतर राखण्यासाठी कर्मचाऱ्यांची शिफ्ट आणि उपस्थिती सुनिश्चित करण्याचे कळवण्यात आले आहे. जीम, व्यायामशाळेमध्ये प्रवेश करतांना प्रवेश द्वाराजवळ सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंगची सोय करावी. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींना प्रवेश द्यावा, जीम, व्यायामशाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्यांच्या नोंदणीसाठी स्वंतत्र नोंदवही ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या आदेशानुसार कारवाई न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.