लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धानोरा, ता.नंदुरबार येथे सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे.सुशिलकुमार रामचंद्र सेवलानी, रा.सिंधी कॉलनी, नंदुरबार यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा कायदा आणि इतर कलमान्वये उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, धानोरा येथे सुशिल ट्रेडर्स या दुकानात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली असता तेथे अवैधरित्या गुटखा आढळून आला. त्यात ९४ हजार ७५० रुपये किंमतीचा विमल पान मसाला गुटखा व ९५ हजार ३९५ रुपये किंमतीचा बजाज, बागवान, मिरास नावाचा गुटखा याशिवाय ४८०० रुपये किंमतीची सुगंधीत सुपारी आढळून आली. राज्यात गुटखा बंदी असतांना व विक्रीस मनाई असतांना देखील सुशिलकुमार सेवलानी यांनी अवैधरित्या विक्रीसाठी त्याचा साठा करून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस कर्मचारी विशाल नागरे यांनी फिर्याद दिल्याने सुशिलकुमार सेवलानी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवलानी यांना अटक करण्यात आली आहे. तपास फौजदार माया राजपूत करीत आहे. दरम्यान, गुजरात सिमेवरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असल्याचे चित्र आहे.
धानोऱ्यात दोन लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:21 IST