शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा सिमावर्ती भाग काँग्रेससोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा तर गुजरातमधील नर्मदा, तापी आणि डांग हे जिल्हे सिमावर्ती आहेत. या भागातील आदिवासी हे पुर्वापार काँग्रेस सोबतच राहिले आहेत. देशात मोदी लाट आल्यानंतर त्याचा परिणाम नंदुरबारसह गुजरातमधील काही भागातही जानवत आहे. मात्र हा प्रभाव आता पुन्हा कमी होत असल्याचे चित्र आहे. गुजरात विधानसभा सोबतच झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तीन पालिका निवडणुकीत दोन पालिका काँग्रेसकडे तर एका पालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. गुजरातमध्ये मात्र सिमावर्ती असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. सिमेलगत असलेल्या गुजरातमधील व्यारा आणि डांग मतदारसंघात यापूर्वीही काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. आता देखील तेथे काँग्रेसने आपली जागा कायम टिकवली आहे. व्यारा मतदारसंघातून पुनाजीभाई गावीत हे 18 हजार 861 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे अरविंद चौधरी यांचा पराभव केला. तर डांग विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मतांनी का होईना काँग्रेसचे मंगल गावीत हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे विजय पटेल यांचा 768 मतांनी पराभव केला. निझर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचे आमदार होते. यावेळी मात्र ही जागा काँग्रेसने मिळविली आहे. सुनीलभाई गावीत हे या मतदारसंघातून दहा हजार 345 मतांनी विजयी झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची रणधुमाळी असतांनाही जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपचेही नेते गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यामुळे या भागातील निकालाकडेही सर्वाचे लक्ष लागून होते.