लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील कसदारपणा हिरावला जात आहे. शिवाय मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कात्री ता.धडगाव येथे जैविक शेतीवर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढीसह मानवांमधील अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी जैविक शेती करणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून कात्री गृपग्रामपंचायतीचे सरपंच बारकीबाई मोहन वळवी यांच्या पुढाकाराने जैविक शेती या विषयावर मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कृषी जागृती चलो गाव की ओर या अभियानाचे राजेंद्र वसावे, संदीप वळवी, माकत्या वळवी, शामसिंग वळवी, दिलीप वळवी अनिता वळवी, सविता पाडवी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा अनेक शेतक:यांनी लाभ घेतला.पूर्वी बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. त्या वेळी शेती ही पूर्ण शेणखतावरच अवलंबून होती. तेव्हा जे धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक होती. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक ते घटक मिळ होते. शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची म्हणून त्या वेळी माणसे 100 ते 125 वर्षे जगत होती, पण आता माणसांचे आयुष्यमान 60 वर आले आहे. हे दुष्परिणाम सर्वस्वी रसायनांचेच असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कात्रीला जैविक शेतीवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:13 IST