शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुतारे येथे शेतीशाळेत महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : तालुक्यातील सुतारे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला शेतकरी गटातील महिलांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : तालुक्यातील सुतारे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला शेतकरी गटातील महिलांची शेतीशाळा घेण्यात आली.‘आत्मा’चे संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व  उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेतीशाळा घेण्यात आली. शेती शाळेच्या माध्यमातून देण्यात येणारे तंत्रज्ञान व विस्तार शिक्षण खऱ्‍या अर्थाने यशस्वी होण्यासाठी शेती व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापनामध्ये महिलांचा सहभाग व्हावा यासाठी महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिला शेतकरी गटाच्या सदस्यांना सुरुवातीस आत्मा पीक प्रात्यक्षिक दरम्यान हरभरा बियाण्याचे तालुका कृषी आर.एम. पवार, पं.स. सदस्य संतोष साबळे, सरपंच दिलीप पवार, मंडळ कृषी अधिकारी आर.सी. हिरे, कृषी पर्यवेक्षक एस.एन. पाटोळे, कृषी सहायक शशिकांत गावीत व ग्रामपंचायत   सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.शेतीशाळेच्या पहिल्या वर्गात कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी शेतीशाळेविषयी माहिती देऊन हरभरा पिकाची जमिनीनुसार वाण निवड, पेरणी अंतर, पेरणीची योग्य तारीख व बीबीएफ मशीनने पेरणी केल्यास होणारे फायदे याविषयी माहिती देऊन महिला शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल यांनी बीज प्रक्रियेचे फायदे व महत्व याविषयी माहिती देताना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. शेतीशाळेच्या नियोजनात कृषी सहाय्यक शशिकांत गावीत यांना चैतन्य संस्था नंदुरबारच्या जिल्हा समन्वयक मोहिनी पाटील व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली. आभार चैतन्य संस्थेच्या योगिता वाघ यांनी मानले.