नंदुरबार : कोकणी-कोकणा व कुकणा समाजाच्या मेळाव्यात कृषी, सिंचन व पाणी बचत या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर विभागाचे उपायुक्त यशवंत पवार होते.कोकणी समाज राज्यासह गुजरात व दादर-नगरहवेली या भागात रहिवासी आहे. या समाजाने एकत्र येवून विधायक कार्यात सहभागी व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन वाघाळे येथे करण्यात आले होते. यावेळी यशवंत पवार, संघटक डॉ.प्रभाकर पवार, तहसीलदार रामचंद्र पवार, सहसचिव प्रभाकर पवार, सरपंच संतूभाई पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आदिवासी समाजाचा एक अभिन्न अंग असलेल्या जल, जमीन, जंगल, पशुधन या पंचसूत्रीतून आदिवासी समाजाचा विकास शक्य असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचे सुखदेव भोसले यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले. डॉ.हरिश्चंद्र कोकणी व प्रा.रंगनाथ बागुल यांनी आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा.सुमनकुममार व किशोर चौरे यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी शेतकऱ्यांच्या योजनांची माहिती दिली. रमेश पवार, संतूभाई पवार, भास्कर पवार, शांताराम गावीत यांनी समाज विकासाबाबत माहिती दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. आरोग्य तपासणीही करण्यात आली. सूत्रसंचलन प्रा.सुलतान पवार व छोटू पवार यांनी केले.
नंदुरबारात कोकणी समाज मेळाव्यात जल सिंचनावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:03 IST