कृषी विभागामार्फत मे महिन्यापासून विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निमखेडी येथे कृषिसेवक आकाश पावरा, भरत पावरा यांनी ग्रामस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांंना उत्पन्नवाढीसाठी तंत्रज्ञान देण्यात येत आहे. त्यात बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असून, त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. मका, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, उडीद या पिकांच्या बियाण्यांची बीजप्रक्रिया केल्यास उत्पन्नात १५ टक्के वाढ दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच जे शेतकरी सोयाबीन लागवडीसाठी घरचे बियाणे वापरतील, त्यांना उगवण क्षमता चाचणी करण्याबाबत सूचित करीत प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी रतिलाल महाले, मंडल कृषी अधिकारी पी. बी. पाडवी, पर्यवेक्षक अनुपरासकर, व्ही. के. भलकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात येत आहे.
निमखेडी येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST