शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

गटविकास अधिका:यांना घेराव

By admin | Updated: March 7, 2017 00:22 IST

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांमध्ये पाणीटंचाई : 15 दिवसात करणार उपाययोजना

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सात पाडय़ांवरील पाणीटंचाई दूर करण्यात यावी याबाबत निवेदन देऊनही पंचायत समितीमार्फत कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याने सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यानी घेराव आंदोलन केले. दरम्यान, 15 दिवसात पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.कन्साई, ता.शहादा ग्रामपंचायतअंतर्गत डेमच्यापाडा येथे 75 कुटुंबे वास्तव्यास असून पाण्यासाठी केवळ एक हातपंप आहे. तोही नादुरुस्त आहे. परिणामी ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. मेंढय़ावळ येथे 25 कुटुंबे वास्तव्यास असून या पाडय़ावरील एकमेव हातपंप वनविकास महामंडळाच्या अधिका:यांनी बंद केला असल्याने ग्रामस्थांना रतनपूर येथून पाणी आणावे लागत आहे. केवडीपाणी येथे 90 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने ग्रामस्थ नदीच्या पाण्याचा वापर करतात. या दूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. धजापाणी येथे 40 कुटुंबे असून विहिरीतील पाणी पुरेसे नाही. अंबापाणी येथे 80 कुटुंबे असून विहिरीच्या पाण्यावरच त्यांना अवलंबून रहावे लागत आहे. सातपिंप्री येथे 30, तर मिठापूर येथे 35 कुटुंबे असून दोन्ही पाडय़ांवर प्रत्येकी एक हातपंप आहे. मात्र ते नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे सातही पाडे 100 टक्के आदिवासीबहुल असून येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे डिसेंबर 2015 व 30 जानेवारी 2017 रोजी लेखी निवेदनाद्वारे करून पाणीटंचाई दूर झाली नाही तर शहादा तहसील कार्यालय अथवा पंचायत           समिती कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला  होता.या निवेदनाची दखल जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतली नसल्याने मंगळवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांच्यासह कार्यकत्र्यानी 11 वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. दिवसभर आंदोलन सुरू होते. जोर्पयत मागणी पूर्ण होत नाही तोर्पयत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी कार्यकत्र्यानी केला.पंचायत समितीचे सभापती दरबारसिंग पवार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एल.ए. बोरदे, एम.पी. बिबळे, ओ.एच. गिरासे, प्रशासन अधिकारी पी.आर. वळवी, हरी लिमजी पाटील यांनी पदाधिका:यांशी चर्चा केली. त्यात या पाडय़ांच्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत जिल्हा परिषदेच्या सव्रेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत मंजूर कृती आराखडय़ात विषयाचा समावेश करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रपत्र ब भरून मंजुरीसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तत्काळ मंजुरीस पाठविण्यात येऊन या पाडय़ांची पाणीटंचाई येत्या 15 दिवसात दूर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. या वेळी फत्तेसिंग भिल, ग्रा.पं. सदस्य संभीबाई भिल, ज्योतीबाई तडवी, राज्या भिल, दारासिंग भिल, दिलीप पवार, किरण खर्डे, गण्या पटले, सामसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी कागणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.