शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

ध्येयवेड्या सुमित्रा वसावे यांच्या अनोख्या मातृत्वाला सलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:32 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘कुपोत्रो जायते कस्मात । कुमाता न भवति...।। अर्थातच कुपुत्र जन्माला येऊ ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘कुपोत्रो जायते कस्मात । कुमाता न भवति...।। अर्थातच कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण कुमाता मात्र कधीही होऊ शकत नाही. या संस्कृत वचनाचा प्रत्यय जेव्हा वास्तव जीवनात येतो तेव्हा अंगावर रोमांच येतो आणि डोळ्यात अश्रू. अर्थातच अक्कलकुवा येथील सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा वसावे ह्या ध्येयवेडी कार्यकर्तीची ही अनोखी मातृत्व गाथा आहे.चार वर्षापूर्वीची ही गोष्ट. नंदुरबारमध्ये फिरणाऱ्या एका पीडित मनोरुग्ण महिलेने जंगलातच एका बालिकेला जन्म दिला आणि ही जन्मदाती आई बाळाला जंगलातच सोडून निघून गेली. काही कार्यकर्त्यांनी या बालिकेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अतिशय गंभीर होती. तिचे वजनही कमी होते.जगण्याची आशाच हरविलेल्या या बालिकेला सुमित्रा वसावे यांनी पाहिले आणि त्या अवस्थेतच तिच्या आयुष्याची जबाबदारी घेत तिने आपल्या घरी नेले. तिची स्वत:च्या मुलीपेक्षाही अधिक काळजी घेतली आणि तिला वाढवले. आज ती चार वर्षाची झाली आहे. तिचे नाव आहे प्रकृती. या प्रकृतीसोबतच सुमित्रा व तिच्या पतीने पूर्ण आयुष्य घालवण्याचे ठरवले असून त्यासाठी या दाम्पत्याने जाणीवपूर्वक स्वत:ला अपत्य न होऊ देण्याची काळजी घेतली आहे.सुमित्रा वसावे यांनी एमएसडब्ल्यूची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी सातपुड्यातील आदिवासींच्या प्रश्नावर चळवळीतून आपले योगदान दिले आहे. सध्या त्या पीडित, शोषित व न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्यायग्रस्त महिलांचे समुपदेशनाचे कार्य करतात. त्यांनी आपले मातृत्व त्यागून दत्तक पुत्रीसाठी जो निर्णय घेतला तो समाजात आदर्शवत ठरत आहे.४प्रकृती ही २० दिवसांची असतांना तिला सुमित्रा वसावे यांनी घरी आणले. त्यावेळी तिची तब्येत खूपच खालावली होती. अनेकांनी तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त करून तिला घरी न आणण्याचा सल्ला दिला होता. परंतु सुमित्रांनी त्या बाळाला जीवनदान आणि तिला मातृत्वाचे प्रेम देण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्यामुळे काही दिवसांच्या प्रयत्नानंतर बाळाची तब्येत सुधारली. पुढे निसर्गानेच या बाळाला त्यांना दिल्याने तिचे नाव ‘प्रकृती’ असे ठेवले.प्रकृती सोबतचा सहवास खरोखरच उत्साहवर्धक वाटतो असे सुमित्रा वसावे यांचे म्हणने आहे. ती सध्या चार वर्षांची असून अक्कलकुवा येथे प्रि स्कूलमध्ये जाते. ती एक चानाक्ष बुद्धमत्तेची असून कुठलीही गोष्ट तिच्या चांगल्या स्मरणात राहते. तिला मोठे होऊन डॉक्टर होणार अशी ती सहजपणे सांगते. त्यामुळे तिचे स्वप्न पुर्ण करण्याचा सुमित्रा यांनी संकल्प केला आहे.