शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात अभिवादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

शहादा येथील नगरपालिका संचलित साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...

शहादा येथील नगरपालिका संचलित साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानी कुलकर्णी यांनी शिवचरित्राचे वाचन प्रत्येकाने केले पाहिजे. वाचनाने स्फूर्ती व मनाला प्रेरणा लाभते, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी के.के. सोनार, प्रकाश शेळके, चतुर पाटील, अजबसिंग गिरासे, प्रमोद सोनार, ग्रंथपाल किशोर पाटील, कांतीलाल पाटील, स्पर्धा परीक्षाचे अभ्यासी विद्यार्थी, वाचकवर्ग आदी उपस्थित होते. किशोर पाटील, कांतीलाल पाटील आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आभार किशोर पाटील यांनी मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शहादा

शहादा येथे शहादा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी व शहर यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शासकीय विश्रामगृह परिसरातील शामियान्यात शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर व शहादा शहराचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक इकबाल शेख यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. याप्रसंगी शहादा शहर युवक उपाध्यक्ष विष्णू भगरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष छोटू कुवर, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत ईशी, माजी युवक तालुकाध्यक्ष समाधान देसले, जिल्हा संघटक तुषार सामुद्रे, देवेंद्र कुवर, श्रावण अहिरे, राजवीर जगदेव, किरण मोघे, राहुल बर्डे, सागर बर्डे, मयूर शर्मा, विनोद अहिरे, महेंद्र अहिरे सचिन अहिरे, रोहित कुवर, सिद्धार्थ कुवर सनी जगदेव, बॉस जगदेव, शुभम कुवर, आकाश पिंपळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास शहादा शहराचे व तालुक्याचे राष्ट्रवादीसह विविध पक्षीय प्रमुख नेते, नगरसेवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

एस.ए. मिशन इंग्लिश स्कूल, नंदुरबार

नंदुरबार येथील एस.ए. मिशन इंग्लिश मीडीयम हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका डॉ.सुनीता अहिरे, पर्यवक्षक सॅबस्टिन जयकर तसेच सांकृतिक मंडळाचे प्रमुख संजय जाधव आणि शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी शालिनी नेरकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांमधून आदेश पाटील, धनश्री राजपूत, तनिष्का पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गुलफाम शेख यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली. मुख्याध्यापिका अहिरे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जेनिफर पंजाबी तर आभार शीला चौधरी यांनी केले.

कार्यक्रमासाठी सांकृतिक कार्यक्रमाचे प्रमुख संजय जाधव आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ग्रामपंचायत, कोठली

शहादा तालुक्यातील कोठली येथील ग्रामपंचायत कार्यालय, शिवजयंती समिती व चैतन्य संस्थेच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच प्रकाश फकिरा पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ आणि नवनिर्वाचित सरपंच गोकूळबाई भालेराव पाटील होते. या वेळी प्रा.ज्ञानेश्वर गवळे, आसाराम माळी, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सरपंच गोकूळबाई भालेराव पाटील, उपसरपंच नम्रता सरदारसिंग गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नितीन पाटील, मीनाबाई जगन्नाथ पाटील, वनसिंग भिल, प्रमिला दिनेश कोळी आदींसह हवलदार रमेश पाटील. पो.कॉ. गावीत, पोलीस पाटील सुकदेव पाटील, ग्रामसेवक योगिता निकम, कोतवाल विद्या ज्ञानेश्वर गवळे, ग्रा.पं शिपाई सोम गवळे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक आत्माराम ओंकार पाटील, आनंदा पीतांबर पाटील, ग्रामसेवक एस.एस. पाटील, आसाराम माळी, राहुल पाटील, सुभाष पाटील, कपिल मंडळे, प्रदीप गिरासे, सागर पाटील, प्रवीण गिरासे, दरबारसिंग गिरासे, राजेंद्र गवळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिव जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर गवळे तर आभार राहुल पाटील यांनी मानले.