शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 12:21 IST

शहादा तालुका : म्हसावद, पाडळदा व कळंबू या गावांचा समावेश; थेट सरपंच निवडीबाबत उत्सुकता

ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सरपंचपदाची थेट मतदारांमधून निवडणूक होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनी निवडणुकीसाठी व्यूहरचना सुरू केली आहे. आठ ग्रा.पं.मध्ये म्हसावद, पाडळदा व कळंबू या मोठय़ा ग्रामपंचायतींचा समावेश असून तेथील निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत.राज्य शासनाने नगरपालिका व महानगरपालिकांच्या नगराध्यक्ष व महापौर पदाची निवडणूक थेट घेण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही कायम ठेवून सरपंचपदाची निवड  थेट मतदारांमधून होणार आहे. शहादा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. लोकनियुक्त सरपंचपदाचा पहिला मान आपल्याला मिळावा म्हणून  इच्छुकांनी गावपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. थेट मतदारांमधून सरपंचांची निवड होणार असल्याने सक्षम व निवडून येणा:या उमेदवारच्या शोधात राजकीय पक्ष व पॅनल प्रमुख आहेत. या पदासाठी सुशिक्षित, स्थानिक व गावातील समस्यांची   जाण असलेला, लोकांची कामे करणारा व गावाचा विकास करणारा उमेदवार आवश्यक आहे. अशा उमेदवाराच्या शोधात सर्वजण  आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राजकीय पक्षाचे ङोंडे बाजूला सारून स्थानिक संबंधांवर निवडणूक लढवली जाते. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व    विरोधक कोण कोणाकडे असतो हे समीकरण लावणे अवघड ठरते. त्यामुळे उमेदवारांचे स्थानिक स्तरावर लोकांशी कसे संबंध आहेत       यावर निवडणूक जिंकणे अवलंबून असते.