शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

आदिवासी विकास मंडळातर्फे धान्य खरेदी केंद्र सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:16 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  आदिवासी विकास विभागाचे सहकारी धान्य खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्यामुळे तळोदा, अक्कलकुवा ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  आदिवासी विकास विभागाचे सहकारी धान्य खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्यामुळे तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यामधील आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडी मोल किमतीत विकावा लागत असून, त्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी महामंडळाने तत्काळ खरेदी केंद्रे सुरू करून धान्य खरेदी करावे, असे साकडे लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी तळोदा येथील महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घातले होते.तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाची शेतीधान्य व वन उपज खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्यासाठी तळोदा उपप्रादेशिक व्यवस्थापकांकडे लोकसंघर्षतर्फे मागणी करण्यात आली होती. कोरोनामुळे उद्भ‌वलेली आर्थिक आणिबाणी व अतिवृष्टीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाची शासकीय हमी भावात खरेदी होत नसल्याने खाजगी व्यापारी व बाजारात कवडीमोल भावात शेतकऱ्याला आपला शेतीमाल विकावा लागतो आहे. नंदुरबार जिल्ह्यात ज्वारी, मका, कापूस असाच हमीभावापेक्षा कमी किंमतीत आदिवासी व इतर शेतकऱ्यांना विकावा लागतो आहे. या परिस्थितीत आदिवासी विकास महामंडळ आदिवासी क्षेत्रात खरेदी केंद्रे सुरू करतात. परंतु हा खरीप हंगाम संपत आला तरी अजूनही आदिवासी विकास महामंडळाने ही केंद्रे मंजूर असूनही सुरू केली नाहीत म्हणून तळोदा येथील महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात जाऊन लोकसंघर्ष मोर्चाच्या अक्कलकुवा, तळोदा व धडगांव तालुक्याच्या प्रतिनिधींनी उपप्रादेशिक व्यवस्थापक प्रतिभा पवार यांना निवेदन देऊन तत्काळ अक्कलकुवा, तळोदा व धडगांव तालुक्यात ही खरेदी केंद्रे सुरू करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी झालेल्या चर्चेत अक्कलकुवा, तळोदा व धडगांव तालुक्यात सहा खरेदी केंद्रे मंजूर आहेत. परंतु कर्मचारी अपूर्ण असल्याने ती सुरू करता आलेली नाहीत, असे समजले. या तिन्ही तालुक्यांसाठी फक्त दोन ग्रेडर उपलब्ध असून, बाकी रिटायर झाले आहेत. अजून त्यांची भरती नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. या वेळी रिटायर झालेल्या ग्रेडरांना मानधन तत्वावर तात्काळ घेऊन ही खरेदी केंद्रे सुरू करा अशी मागणी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.शासनाच्या २९ सप्टेंबर २०२० आदेशानुसार खरीप हंगाम २०२०-२१ साठी धान व भरड धान निर्धारित आधारभूत मुल्यानुसार खरेदी करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात नासिक आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करायचा निर्णय असताना ही खरेदी झालेली नाही. मक्याचे निर्धारित मूल्य हे एक हजार ८५० रूपये तर ज्वारीचे मूल्य दोन हजार ६२० इतके असताना ही खरेदी केंद्रे चालू न झाल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे ८०० ते एक हजार २०० रूपये इतक्या कमी भावात आपला मका व ज्वारी विकावी लागली. ही इथल्या आदिवासींची खूप मोठी लूट आहे. या बद्दल लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप घेतला.  या वेळी प्रतिभा पवार यांनी आदिवासी महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी तुटवडा असल्याने तळोदा तालुक्यात शिर्वे व प्रतापपूर येथे आणि अक्कलकुवा व खापर अश्या          चार ठिकाणी आठवड्यातील किमान दोन दिवस या प्रमाणे २० तारखेपासून खरेदी केंद्र सुरू करतो असे सांगितले आहे.ही केंद्र सुरू झाली नाहीत तर लोकसंघर्ष मोर्चातर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या चर्चेत लोकसंघर्ष मोर्चातर्फे काथा वसावे, रमेश नाईक, बाबूलाल नाईक, दिगंबर खर्डे, पंडित पाडवी, दिलवर वळवी, अशोक पाडवी, गोमा वसावे, भानुदास वसावे, निशांत मगरे आदी प्रतिनिधी सहभागी होते.