शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शासनाने विद्यापीठातील हस्तक्षेप थांबवावा व वर्ग तासिका त्वरित सुरू कराव्या, विद्यापीठ विकास मंचची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

महाराष्ट्र शासनाने २०१६ विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमणूक करण्यात ...

महाराष्ट्र शासनाने २०१६ विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमणूक करण्यात आली आहे. विद्यापीठ कायद्यात अनावश्यक बदल करून कामकाजामध्ये ढवळाढवळ करणे आणि राज्यपालांचे अधिकार कमी करून राजकीय हस्तक्षेप वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून शासनाने विद्यापीठाच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा व शैक्षणिक वर्ग तासिका सुरू कराव्या, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे कुलगुरू पी.पी. पाटील यांना करण्यात येत आली आहे.

निवेदनात शासनाने मुंबई विद्यापीठात कुलसचिवांची नेमणूक करून विद्यापीठाच्या कामकाजात अवैधरित्या हस्तक्षेप करणाऱ्या सरकारला न्यायालयाने फटकारले असून शासनाने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग तासिका अद्याप सुरू झालेले नाही, राज्यातील महाविद्यालय कधी सुरू होतील, विद्यार्थी प्रतीक्षेत असून राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. कोरोना प्रतिबंधक नियमामुळे मार्च २०२० पासून विद्यापीठ व महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ग बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू असून ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा, शिक्षणाची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे शासनाने दुर्लक्ष होत असून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेतील विनाअडथळा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र पदवी आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. शासनाने त्वरित सर्व शैक्षणिक वर्ग सुरू करावे. अशी मागणीदेखील निवेदनाव्दारे विद्यापीठ विकास मंचने केलेली आहे. विद्यापीठ कायद्यात बदल करून आपला राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा प्रयत्न सरकारने त्वरित थांबवावा. विद्यापीठ व महाविद्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ विकास मंचातर्फे यावेळी देण्यात आलेला आहे.

यावेळी विद्यापीठ विकास मंचचे शहादा तालुका प्रमुख गौरव पाटील, विद्यापीठ विकास मंचचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील, अधिसभा सदस्य डॉ. दिनेश खरात, नंदुरबार तालुका प्रमुख धर्मराज करंकाळ, तळोदा तालुका प्रमुख धनंजय पाटील, अक्कलकुवा तालुका प्रमुख कमलेश शिंदे, नवापूर तालुका प्रमुख संदीप शेगर, योगेश आहिरे, अक्षय तिरमले, कल्पेश ठाकरे, शांत नवले, गणेश सोनवणे, रोहित तिरमले, दिनेश पवार, गणेश सोनवणे, त्यागराज मराठे, धनंजय कटारे, प्रेम माळी, चेतन पाडवी, प्रेमकुमार सूर्यवंशी, प्रा.आर.डी. मोरे, संदीप वसावे, रवींद्र वसावे, अर्जुन वसावे, अविनाश वसावे, चंद्रसिंग वसावे, दिनेश वसावे, सुदाम वसावे, विश्वास पाडवी, दीपक पाडवी, मंगेश वळवी, अभाविप जिल्हा संयोजक नीलेश हिरे, जिल्ह्यासह संयोजक प्रीतम निकम, शुभम स्वामी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.