लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सातपुडय़ातून आलेल्या बिबटय़ाने मोड ता.तळोदा येथे धुमाकूळ घातला असून एका वाडय़ात प्रवेश करीत तीन शेळ्याही त्याने ठार केल्या. त्यामुळे मोड गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र शांतता असताना मोड येथील रामसिंग जामसिंग ठाकरे यांच्या वाडय़ात प्रवेश करीत तेथील सापैकी तीन शेळ्यांवर त्याने हल्ला केला. शेळ्यांचा आवाजाने जागे झालेल्या वासंतीबाई ठाकरे यांनी वाडय़ात डोकावले असता तीन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. रात्रीच नागरीक तेथे जमल्याने बिबटय़ाने तेथून पळ काढला. या घटनेमुळे मोडसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानसार वनपाल आनंदा पाटील, वनरक्षक राज्या पावरा, अमित वळवी यांनी घटनेचा पंचनामा केला. शिवाय तेथे फटाकेही मोडण्यात आली. या बिबटय़ाच्या नियंत्रणासाठी गावात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
मोड येथे बिबटय़ाकडून शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:09 IST