शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

चोरट्यांनी गोरगरीबांची घरे केली लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागात एकाच रात्रीतून आठ ते दहा ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न तसेच चोरीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागात एकाच रात्रीतून आठ ते दहा ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न तसेच चोरीचा प्रकार झाला आहे़ यात चोरट्यांनी थेट गोरगरीबांना लक्ष करुन घरातील कपडे, धान्य आणि पैसे चोरुन नेल्याचे प्रकार समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.तालुक्यातील रनाळे येथे मंगळवारी पहाटे एक ते पाच यादरम्यान चोरट्यांनी निलेश चिमणराव आव्हाड यांच्या घरातून १५ हजार रुपये रोख व ४ हजार रुपये किमतीच्या साड्या चोरुन नेल्या तसेच गावातील भिलाटीत राहणाऱ्या रुख्माबाई ठेलारी यांच्या घरातून १० हजार ५०० रुपये किमतीचे तांब्या पितळीचे भांडे व १० हजार रुपयांची बाजरी चोरुन नेली़ निलेश आव्हाड व रुख्माबाई ठेलारी यांच्या घरांना कुलूप असल्याने चोरट्यांनी संधी साधून कुलूप तोडून आत प्रवेश ही चोरी केली होती़याबाबत निलेश आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़ मंगळवारी पहाटे गावातील इतर ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे़