प्रकाशा येथील प्रेरणा ग्रामीण पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. सखाराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्हा. चेअरमन विजय जैन, संचालक हरी पाटील, चौधरी सुधीर पाटील, एकनाथ चौधरी, मोहन भोई, अश्विन सोनार, रवींद्र चौधरी, अरुण मोरे, रमेश ठाकरे, मोईज बोहरी, नारायण चौधरी, वसंत चौधरी आदी उपस्थित होते. सभेनंतर संचालक मंडळाच्या उपस्थितीत कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावस्कर, डॉ. रवींद्र पावरा, तलाठी धर्मा चौधरी, जमादार सुनील पाडवी, विकास शिरसाठ, आरोग्यसेविका सी. व्ही. भारती, आरोग्यसेवक एस. एच. सोनार यांच्यासह वाहनचालक, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा करणारे अशोक हरी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. हरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन भोई यांनी आभार मानले.
प्रेरणा संस्थेकडून कोरोना योद्धयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST