शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे जिनिंग उद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापसातून सरकी वेगळी करत रुईच्या गाठी तयार करुन त्याची निर्यात करणारा जिनिंग उद्योग सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापसातून सरकी वेगळी करत रुईच्या गाठी तयार करुन त्याची निर्यात करणारा जिनिंग उद्योग सध्या संकटात आहे़ सोबतच जिल्ह्यातील एकमेव सहकारी सूतगिरणीही बंद असल्याने सूत उद्योगाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे़ तूर्तास जिनिंग मिल्स ह्या सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी तयार करुन देत आहेत़खरीप हंगामात साधारण दीड लाख हेक्टरवर लागवड होणाऱ्या कापूस उत्पादनाची खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करणाºया सात जिनिंग मिल जिल्ह्यात आहेत़ यातही यंदाच्या हंगामात केवळ शहाद्यात दोन तर तीन मिल नंदुरबार येथे सुरु आहेत़ या जिनिंग दरवर्षी किमान अडीच ते तीन लाख क्विंटल कापूस खरेदी करुन त्याच्या गाठी तयार करुन निर्यात करतात़ यातून अर्थकारणालाही वेग येतो़ मात्र लॉकडाऊनमुळे कोट्यावधी रुपयांच्या गाठी निर्यात करणाºया या मिल बेरोजगार झाल्या आहेत़जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून कापूस खरेदीला सुरुवात होते़ शहादा आणि नंदुरबार येथील सीसीआयच्या केंद्रांमध्ये कापसाची खरेदी केली जाते़ सोबत परवानाधारक सात जिनिंगला कापूस खरेदी करण्याची मुभा असते़ यंदा नोव्हेंबरमध्ये कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर २२ मार्चपर्यंत नंदुरबार येथील सीसीआयच्या केंद्रात ९५ हजार क्विंटल तर शहादा येथील केंद्रात १ लाख ७८ हजार क्विंटल कापूस खरेदी पूर्ण झाली होती़ सीसीआयने ५ हजार ३५० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर दिल्याने शेतकरी याठिकाणी गर्दी करत होते़ राष्ट्रीय बाजारात याचवेळी कापसाचे दर हे ४ हजार ५०० रुपयांच्या पुढे नव्हते़ जिनिंग व्यवसाय करणारे सीसीआयच्या बरोबरीने कापूस खरेदी करु शकत नसल्याने त्यांचा हंगाम हा जानेवारीच्या अखेरीसच संपुष्टात आला़ खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी आणि सरकी याची विक्री केल्यानंतर जिनिंग मालक पुन्हा कापूस खरेदीच्या प्रतिक्षेत होते़ परंतू मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने जिनिंग उद्योग पूर्णपणे बंद पडला़ १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर शहादा आणि नंदुरबार येथील सीसीआयच्या केंद्रांनी सर्व जिनिंग भाडोत्री पद्धतीने घेत त्यात कापसाच्या गाठी तयार करणे सुरु केले आहे़ यातून जिनिंग उद्योजकांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी यातून अपेक्षित असा खर्च वसूल होणार नसल्याने ऐन कापूस हंगामातील नुकसान भरुन येणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे़ यातच कामांसाठी मजूर नसल्याने गाठी तयार करुन त्याची निर्यात करण्यास अडचणी येत आहेत़शहादा येथे लॉकडाऊनपूर्वी शेतकºयांचा १ लाख ७८ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता़ लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर येथे पुन्हा ३७ हजार क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी झाला आहे़ या कापसाच्या गाठी तयार करण्यासाठी सीसीआयने येथे दोन जिनिंग भाड्याने घेतल्या आहेत़ याठिकाणी कापूस आणि सरकी वेगळे करण्यात येत आहे़ सरकीचा लिलाव सीसीआय जागेवर करण्यात येत आहे़ तयार करण्यात आलेल्या गाठी ह्या साठा करण्याचे आदेश केंद्र सरकारने सीसीआयला दिले आहेत़ यामुळे शहादा येथे तयार होणाºया गाठी मनमाड येथे पाठवण्यात आले आहेत़ केंद्र शासनाने मनमाड येथे गोडावून मंजूर करुन दिल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजाराच्या जवळपास गाठी रवाना करण्यात आल्या आहेत़सूतगिरणीही सुरु होण्याची शक्यताशहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी ही नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव सूतगिरणी आहे़ १९८५ पासून सुरु असलेली सूतगिरणी दरवर्षी किमान पाच लाख क्विंटल कापूस खरेदी करते़ यातून दरवर्षी किमान ३५ टन गाठींची निर्यात ही युरोप खंडातील देश, चीन, व्हिएतनाम, इस्त्राईल या देशांमध्ये करते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे निर्यात बंद असल्याने सूतगिरणीचे उत्पादनही बंद आहे़ दरम्यान राज्यातील सोलापूर, मालेगाव भिवंडी यासह विविध भागातील पॉवरलूम उद्योगही संकटात असल्याने येथून निर्यात होणाºया गाठींच्या संख्येवर मर्यादा आली आहे़ सूतगिरणीतून निर्यात होणाºया मालाचा व्यवहार हा परकीय चलनातून होत असल्याने जिल्ह्याची आर्थिक स्थिती मजूबत करण्यात या सूतगिरणीचा मोठा वाटा आहे़ गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली ही सूतगिरणी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यावर संचालक मंडळ भर देणार आहे़ यातून येत्या आठवड्यात कामकाज सुरु होवून कामगारांना रोजगार मिळणे शक्य होणार आहे़सीसीआयच्या गाठी तयार करुन त्यांची निर्यात करणाºया जिनिंग व्यावसायिकांना पावसाची भिती आहे़ पाऊस पडून गेल्याने कापसातून सरकी वेगळी करणे जड जात असल्याने कामावर परिणाम होतो़ मशिनही बंद पडते़ यामुळे खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रियावर वेग देण्याचा प्रयत्न सुरु आहे़ दर दिवसाला ५०० गाठी तयार करण्याचे टार्गेट घेऊन जिनिंग मिलमध्ये काम सध्या काम सुरु आहे़