लवकर संपून जावो कोरोना पण माणूसकी कधीही सरो ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:07 PM2020-11-20T12:07:34+5:302020-11-20T12:07:41+5:30

  लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माणसाचं माणूसपण पणाला लावल्याचा अनुभव कोरोना काळात सर्वांनाच आला आहे. अद्याप कोरोना काळ ...

Get rid of it soon, Corona, but never lose your humanity | लवकर संपून जावो कोरोना पण माणूसकी कधीही सरो ना

लवकर संपून जावो कोरोना पण माणूसकी कधीही सरो ना

Next

  लाेकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माणसाचं माणूसपण पणाला लावल्याचा अनुभव कोरोना काळात सर्वांनाच आला आहे. अद्याप कोरोना काळ सुरूच असल्याने माणूसकीचा अनुभव येणेही सुरूच आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वाॅर्डात आणि महिला रुग्णालयात दिवाळी साजरी करत रुग्णांमध्ये जोश भरण्याचे काम परिचारिका आणि डाॅक्टरांनी केले होते. त्यांच्या अनोख्या दिवाळीमुळे रुग्णांनी कोरोना लवकर संपून जावो परंतू माणूसकी कधीच सरोना अशीच प्रतिक्रिया दिली.  
कोरोना रुग्णांसाठीच्या नेत्रकक्षासह महिला रुग्णालयात दिवाळी साजरी करण्यात आली. आवारासह  वाॅर्डात दिवे लावत रुग्णांच्या बेडवर काहीतरी गोडधोड देण्याचाही प्रयत्नही यावेळी झाला. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांपासून लांब असलेल्या कुटूंबियांनीही फराळाचा चिवडा, चकली, लाडू यासह विविध पदार्थ पाठवून दिले होते. यामुळे उपचार सुरू असतानाही रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. दरम्यान कोविड रुग्णालयात काम करणा-या सफाई कर्मचा-यांनी घरी न जाता येथेच हजर राहत झाडू पूजन करुन दिवाळी साजरी केली. 

कोणी दिवे आणले, कुणी सजावट केली तर कुणी गोडधोड आणत होते. ही दिवाळी आयुष्यभर स्मरणात राहण्यासारखीच आहे. कुटूंबापासून लांब असलो तरीही येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांनी कुटूंबांची कमी भासू दिली नसल्याची प्रतिक्रिया वाॅर्डात दाखल एका कोरोनाबाधितने दिली. 

 कोरोनाबाधितांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव हा वेगळा होता. रुग्णालयात कर्तव्यावर असताना अशी वेळ येणे हे नवीनच होते. परंतू सर्वांचा उत्साह आणि एकोप्यामुळे दिवाळी स्मरणात राहिल.     
     -डाॅ. हेमंत जिरे,
     वैद्यकीय अधिकारी, नंदुरबार.

Web Title: Get rid of it soon, Corona, but never lose your humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.