शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

दुकानासह बँक फोडणारी अल्पवयीन टोळी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून ६५ मोबाईल चोरणारे आणि १५ दिवसांपूर्वी डीडीसी बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून ६५ मोबाईल चोरणारे आणि १५ दिवसांपूर्वी डीडीसी बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीतील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नंदुरबारातील बसस्थानक परिसरातील मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून चोरट्यांनी २० सप्टेबर रोजी रात्री दुकान फोडून दोन लाख ८१ हजार रुपयांचे ६५ मोबाईल लंपास केले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या धाडसी चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या चोरीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. एलसीबी आणि शहर पोलीस ठाण्याचे वेगवेगळे दोन पथक यासाठी तयार करण्यात येऊन तपासाला सुरूवात करण्यात आली. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी करणारी अल्पवयीन मुलांची टोळी असल्याचे स्पष्ट झाले. पथकांनी गिरिविहार गेट झोपडपट्टी, जोगनीमाता मंदीर, चार रस्ता येथील अल्पवयीन मुलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.पथकांनी त्या ठिकाणी जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांना एलसीबीच्या कार्यालयात आणले असता त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह ही चोरी केल्याचे स्पष्ट केले. त्यांचे इतर साथीदार चिंचपाडा भिलाटीसह त्यांच्या परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. परंतु चोरीचा माल कुठे ठेवला ते माहिती झाल्यावर पोलिस पथकाने त्या घरात तपासणी केली असता चोरीचे ६५ मोबाईल आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहेत. या अल्पवयीन मुलांच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.बँक फोडीचाही प्रयत्नयाच अल्पवयीन मुलांनी १५ दिवसांपूर्वी गिरिविहार कॉलनीलगतच्या इंदिरा व्यापारी संकुलातील डीडीसी बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या घटनेचा गुन्हा देखील ७ सप्टेबर रोजी उपनगर पोलिसात दाखल आहे. या घटनेत बँकेचे चॅनेल गेट तसेच आतील मुख्य दरवाजाचे गेट देखील तोडले होते.तीन अल्पवयीन चोरट्यांसह पोलिसांनी दोन लाख ८९ हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस कर्मचारी राकेश मोरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र कळमकर, कर्मचारी संदीप गोसावी, भटू धनगर, इम्रान खाटीक, हेमंत बारी यांच्या पथकाने केली.