शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्ह्यात ५३ जणांवर कोविड-१९ नुसार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:30 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येक धर्मशास्त्रात अंत्यविधीला महत्वाचे स्थान आहे. परंपरेप्रमाणे अंत्यविधी व्हावा हा प्रत्येकाचा ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रत्येक धर्मशास्त्रात अंत्यविधीला महत्वाचे स्थान आहे. परंपरेप्रमाणे अंत्यविधी व्हावा हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. परंतु कोरोनामुळे अनेकांच्या नशीबी ते देखील आले नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील ५३ जणांच्या नशीबी ते नव्हते हे स्पष्ट झाले आहे. अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ५३ जणांवर पारंपारिक ऐवजी कोविड-१९ च्या मार्गदर्शक नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यातील २४ जण पॉझिटिव्ह असल्याचे रेकॉर्डवर आहे.कोरोनाने अनेकांचे होत्याचे नव्हते केले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना आर्थिक व मानसिक फटका सहन करावा लागलाा आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळून आला होता. तेंव्हापासून आतापर्यंत अर्थात २६ जुलैपर्यंत संशयीत व पॉझिटिव्ह अशा ५३ जणांना जीव गमवावा लागला आहे. परंतु प्रत्यक्षात २४ जणांचाच अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे रेकॉर्डवर नोंद आहे.जिल्हा रुग्णालयात कोविडची प्राथमिक लक्षणे असलेल्यांवर उपचार करण्यात आले. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता जिल्हा प्रशासनानेच कोविड-१९ च्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग, नगरपालिका विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या जबाबदारी पार पाडली आहे. या ५३ पैकी ३४ जणांवर नंदुरबारातील त्या त्या धर्माच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यासाठी नंदुरबार पालिकेचे मोठे सहकार्य मिळत आहे.

२० एप्रिल ते २६ जुलै...1कोरोनामुळे जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद २० एप्रिल रोजी करण्यात आली होती. या मृतदेहावर नंदुरबारात अंत्यसंस्कार करण्यात आले.2कोरोनाची लक्षणे असलेले परंतु स्वॅबचा अहवाल न आलेल्यांचेही दक्षता म्हणून कोविड-१९ नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्या शहरात किंवा गावी मृतदेह नेण्यात येत होता.3दिड महिन्यापासून कोविडग्रस्त किंवा संशयीताचा मृतदेह हा गावी न नेता नंदुरबारातील स्मशानभूमीतच सर्व नियम पाळून अंत्यसंस्कार केले जाऊ लागले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून संशयीत किंवा पॉझिटिव्ह अशा सर्वांचे अंत्यसंस्कार नंदुरबारातच करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार नंदुरबारातील जुन्या स्मशानभुमीत अग्निसंस्कार तर त्या त्या धर्माच्या दफनभुमीत दफनविधी केला जात आहे. लागलीच परिसर सॅनिटाईज केला जात असतो. यासाठी पालिकेचे दोन कोरोनायोद्धा काम करीत आहेत. त्यांना उचीत मानधनही दिले जात आहे. पालिकेकडून सेवाधर्म म्हणून सर्व बाबी त्यासाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.

कोरोना संशयीत किंवा पॉझिटिव्ह रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यावर कोविड-१९ नुसार त्या मृतदेहावर सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडावी लागते. दोन नातेवाईकांना उपस्थित राहता येते. काहीवेळा नातेवाईकांना अंत्यदर्शनाची सोय केली जाते. त्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. -डॉ.आर.ए.थोरात, न्यायवैद्यक अधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार मेड लिकफ्रूफ बॉडी बॅग...च् मृतदेह अंत्यसंस्काराला पाठविण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. आधी मृतदेहाला आवश्यक ते केमिकल लावले जाते. नंतर ते एका बॅगेत पॅक केले जाते. संबधीत बॅग ही मुंबई, दिल्ली येथून मागवावी लागते. एका बॅगला दीड हजाराचा खर्च येतो. शिवाय वेळेवर उपलब्ध होत नाही.च्ही बाब लक्षात घेता न्यायवैद्यक अधिकारी डॉ.आर.ए.थोरात यांनी स्थानिक ठिकाणीच अवघ्या हजार रुपयात बॅग बनवून घेतली आहे. एक बॅग पारदर्शी असते त्यावर पुन्हा दुसरी बॅग असते ती थोडी हेवी असते. यातून मृतदेहाचा चेहरा नातेवाईकांना पहाता येतो. पारंपारिक साधनांद्वारे या बॅगा तयार करण्यात आल्या आहेत.