तालुक्यातील रजाळे येथील धनदाई मातेच्या मंदिरालगत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. या बंधाऱ्यातून पावसाळ्याचे पाणी वाहून जात असल्याने या बंधाऱ्याचा कोणताही उपयोग होत नसल्याने तो निरुपयोगी ठरत होता. मात्र ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद निधीमधून १५ लाखांचा निधी मिळवून दिला आहे. या बंधाऱ्याचा दुरुस्तीचा नुकताच शुभारंभ करण्यात आला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी ॲड.राम रघुवंशी व शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आभार मानले. या बंधाऱ्याचा पाण्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेती बागायती खाली येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश शिंत्रे, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील, सरपंच रेखा पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच डॉ. शंकर पाटील, मानसिंग गिरासे, नरेंद्र मराठे, गायकवाड, चौधरी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गोकूळ सोनवणे, भवन पाटील, गिरीश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
रजाळे येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाखांचा निधी; कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST