Frugal trade between martyrs: Suffering it | शेतीच्या पैशांच्या वादातून शहाद्यात व्यापा:यास मारहाण
शेतीच्या पैशांच्या वादातून शहाद्यात व्यापा:यास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शेती विक्रीच्या पैशांच्या वादातून जमावाने सोनाराच्या दुकानावर हल्ला दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शहाद्यात बुधवारी दुपारी घडली. याबाबत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 
सलीम शेख, शकीला शेख युनूस मक्राणी, शहारूख सलीम व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, चंद्रशेखर सोनार, रा.शहादा व सलिम शेख यांच्यात 2016 मध्ये शेती खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्या व्यवहारातील पैशांच्या देवानघेवानच्या कारणावरून हा वाद झाला. दुपारी सलीम शेख व त्याची प}ी सोनार यांच्याकडे गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेख घरी गेला. तेथून त्यांनी इतर चौघांना आणून सोनार यांच्यावर बेस बॉल स्टिकने हल्ला केला. यात चंद्रशेखर सोनार यांच्या हाताचे हाड मोडले. दुकानात असलेल्या सोनार यांच्या आईला ढकलून खाली पाडले. सोनार यांच्या भावाला देखील मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दुकानाचे देखील नुकसान झाले.
याबाबत शहरात एकच चर्चा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरिक्षक संजय शुक्ला यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 
चंद्रशेखर सोनार यांनी फिर्याद दिल्याने सलीम शेख शकिला शेख युनूस मक्राणी, शहारूख सलीम व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार तारसिंग वळवी करीत   आहे.
दरम्यान, पोलिसांनी सलिम शेख, शकिला मक्राणी, शहारूख सलीम व इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. 


Web Title: Frugal trade between martyrs: Suffering it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.