लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुदानीत शाळा नसतांना ती अनुदानीत असल्याचे सांगून युवकाची व महिलेची साडेचार लाखात फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी चोपडा, जि.जळगाव व नंदुरबार येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिपक रघुनाथ पाटील, रा.चोपडा व मनोज शंकर वसईकर, रा.नंदुरबार असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबार येथील म्हाडा कॉलनीत राहणारे दिपक रघुनाथ पाटील यांच्या मुलाला व मुलीला नोकरीचे अमिष दाखविण्यात आले. ढंढाणे-वनकुटे, ता.नंदुरबार येथे विधीज बहुउद्देशीय फाऊंडेशन चोपडा संचलित एकलव्य प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अनुदानीत असल्याचे सांगितले. या ठिकाणी विठ्ठलदास वसईकर यांच्या मुलास शिपाई म्हणून लावण्यासाठी तीन लाख रुपये घेतले. तर मुलीला स्वयंपाकी म्हणून लावण्यासाठी दीड लाख रुपये घेतले.२०१२ मध्ये ही रक्कम घेऊनही दोघांना पगारही नाही आणि कायम स्वरूपी नोकरीही नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे वसईकर यांनी फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज शंकर वसईकर यांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक बाळासाहेब भापकर करीत आहे.
नोकरीच्या अमिषाने साडेचार लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:25 IST