तळोद्यात चार दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:33 PM2020-04-07T12:33:19+5:302020-04-07T12:33:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील मलिक कॉम्प्लेक्समधील चार दुकानांना शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत साधारण साडेअकरा लागांचे नुकसान झाले आहे. ...

Four shops in the basement fire | तळोद्यात चार दुकानांना आग

तळोद्यात चार दुकानांना आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील मलिक कॉम्प्लेक्समधील चार दुकानांना शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत साधारण साडेअकरा लागांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. बडरी कॉलनीतील नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळून आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील बडरी कॉलनीतील मलिक कॉम्प्लेक्समधील मलक स्पेअर पार्टस् या दुकानाला विजेच्या शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण करत त्याच्या शेजारील अजेरीचा हार्डवेअर, जुनेर मोबाईल, मोनाली कोल्ड्रीक्स या तीन दुकानांनाही आग लागून त्यातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. हा प्रकार गल्लीतील रूणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकानाचे मालक सिकीब मलक यांना उठविले. त्यांनी नगरसेवक अमानुद्दीन शेख यांना कळविले. त्यांनी थेट नगरपालिकेला कळविल्यानंतर नगरपालिकेच्या अग्नीश्मन बंब तेथे पोहोचला. गल्लीतील नागरीक व पालिकेच्या बंबामुळे आगीवर पाण्याचा वर्षाव करून लवकर आग विझविण्यात यश आले. साहजिकच यामुळे व्यापारी संकुलातील इतर दुकानांचेही नुकसान टळले. फौजदार ज्ञानेश्वर पाऊले हे आपल्या पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पंचनाम्यानुसार मलक सिकीब, सुलतान मलक यांचे स्पेअर पार्टस् दुकानाचे चार लाख, अनवर अलीखान यांचे हार्डवेअरचे साडे सहा लाख, जुनेद शेख मनवर यांचे मोबाईल रिपेअरिंगचे २० हजार व योगेश सुभाष शर्मा यांचे कोल्ड्रींक्सचे एक लाख असा एकूण साडे ११ हजार रूग्णांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीकीब मलक यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसात अग्नी उपद्रवाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ.दिलीप जगदाळे करीत आहे. या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: Four shops in the basement fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.