प्राचार्य आत्महत्या प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:41 PM2020-10-22T12:41:10+5:302020-10-22T12:41:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिजामाता औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.रवींद्र चौधरी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन प्राध्यापकांसह ...

Four remanded in principal suicide case | प्राचार्य आत्महत्या प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

प्राचार्य आत्महत्या प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिजामाता औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.रवींद्र चौधरी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन प्राध्यापकांसह एका व्यावसायिकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 
आर्थिक देवानघेवानच्या कारणावरून प्राचार्य चौधरी यांनी महाविद्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केले होती. त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी अनील चौधरी, प्रा.मुकेश वाडेकर, प्रा.रवींद्र साळुंखे व    आणखी एकजण अशा चार जणांना अटक करण्यात आली होती. चार दिवशीय पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी    न्यायालयात हजर करण्यात आले   होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली     आहे.
इतर संशयीतांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक भापकर यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या चौघांकडून पोलिसांनी बरीच माहिती मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने आता पोलीसांनी तपासाला सुरुवात केली असल्याचे सूत्रांनी सागितले. 

Web Title: Four remanded in principal suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.