शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोनगडनजीक अपघातात मालेगावचे चारजण ठार तर १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : सोनगढ जवळ पोखरण गावाच्या शिवारात गुजरात परिवहन विभागाची एस. टी. बस, टॅकर व जीपगाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सोनगढ जवळ पोखरण गावाच्या शिवारात गुजरात परिवहन विभागाची एस. टी. बस, टॅकर व जीपगाडी अश्या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात आठ जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. त्यात मालेगावनजीकच्या गुगळवाडी येथील चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर १२ जण जबर जखमी झाले. नवापूर येथील तिघांचाही जखमींमध्ये समावेश आहे.मृतांमध्ये समाधान अशोक शिंदे (३५), रा.वनपट, ता.मालेगाव, (५०), अशोक आत्माराम निकम (३८), विश्वास रतन निकम (४२), पर्बत देवचंद निकम (३५) सर्व रा.गुगळवड, ता.मालेगाव अशी महाराष्टÑातील मयतांची नावे आहेत. तर हसमूख रामू गामीत (बसचालक) टँकरमधील तिघा मृतकांची ओळख पटली नाही.सोनगढहून उकाईकडे येणारी गुजरात परिवहन विभागाची एस. टी. बस ( क्रमांक जीजे १८ झेङ ६४६८) व सुरतकडे आॅईल वाहुन नेणारा रिकामा टॅकर (क्रमांक जीजे ०२ एएस ६५८८) भरधाव वेगाने जात असतांना सोनगढ पासुन सात किलोमिटर अंतरावर पोखरण गावाच्या शिवारात समोरासमोर धडकले. यात भर म्हणुन मालेगाव कडुन सुरतेकडे जाणारी जीप (क्रमांक एमएच ४१- एएस ५३०९) दोन्ही अपघातग्रस्त वाहनांच्या मधोमध जाऊन धडकली. बस व टॅकरच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात नऊ जण जागीच ठार झाल्याचे वृत्त असुन मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. जखमींना सोनगढ, व्यारा व सुरत येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.मृतात मालेगावच्या निकम परिवारातील अशोक निकम, विश्वास रतन निकम, समाधान निकम या तिघांचा समावेश आहे. जीप मधील सहप्रवाशी प्रतिभा समाधान निकम (३०), दिपक देवराम निकम (५०), बाळा दौलत पवार (६०), कैलास रतन निकम (६५), नितीन दाऊल शिंदे (२०), महेश संतोष निकम (३५), सुरेखा अताळे (४०), सुरेश दौलम निकम (६०), उमेश अरुण पवार (२६), राजेंद्र रामदास निकम (५४), प्रितेश अजय निकम (२०), सरला रामदास सामुद्रे (३०), सुरेशखा मुरलीधर निकम (५०), संजय आत्माराम निकम (४०), राजेंद्र रामदास निकम (३५) सर्व रा.मालेगाव, प्रिती सुरेश वसावा (१८) रा.निमदर्डा, ता.नवापूर, सागर रमण गोस्वामी (२६), राहुल राजू गोस्वामी (२६) रा.नवापूर असे महाराष्टÑातील जखमींची नावे आहेत. याशिवाय गुजरातमधील सोनगड व व्यारा येथील काही जणांचा समावेश आहे.त्यांना व्यारा व सुरत येथे हलविण्यात आले आहे. जखमींमधे नवापूर येथील सागर रमला गोस्वामी व राहुल राजु गोस्वामी यांचाही समावेश आहे. बस व जीप मधील एकुण २९ प्रवासी जखमी असुन त्यात सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.मयत सात जणांची उशीरापर्यंत ओळख पटली नव्हती. अपघाताची भिषणता पाहुन महामार्गावरुन जाणाऱ्या वाहन धारकांनी आपल्या वाहनातुन जखमींना सोनगढ व व्यारा पावेतो आणले. सोनगढ व व्यारा येथील स्वयंसेवी समाजकार्य करणारे असंख्य युवक घटनास्थळी धावुन गेल्याने बचाव कार्यात गती आली.