शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

नंदुरबारातील चार व्यापा:यांना तळोद्यानजीक लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : किराणा मालाच्या वसुली करणा:या व्यापा:याचा गाडीच्या पुढे मोटारसायकली उभ्या करून व्यापा:यांना धारधार शस्त्रास्त्र दाखवत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : किराणा मालाच्या वसुली करणा:या व्यापा:याचा गाडीच्या पुढे मोटारसायकली उभ्या करून व्यापा:यांना धारधार शस्त्रास्त्र दाखवत त्यांच्याकडून साधारण चार लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाखांचा मुद्देमाल रस्ता लुटारूंनी चोरल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आमलाड नजीक अंकलेश्वर-ब:हाणपूर मार्गावर घडली. महिनाभरात रस्ता लुटीची सलग तिसरी-चौथी घटना घडल्याने व्यापा:यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, अशा कारवायांवर ठोस कार्यवाही करण्यासाठी शहरातील व्यापा:यांनी उपविभागीय अधिका:यांना साकडे घातले होते.मिळालेल्या माहिती नुसार नंदुरबार येथील साखरेचे व्यापारी उमेद रूपाचंद जैन, विरलकुमार महावीर जैन, किशोर घेवरचंद ताथेड व पप्पू घेवरचंद जैन हे चार व्यापारी नेहमीप्रमाणे दोन-तीन दिवसानंतर अक्कलकुवा, तळोदा व प्रकाशा येथे विकलेल्या किरणा मालाची वसुलीसाठी किरणा प्रतिष्ठानांवर येत असतात. शुक्रवारी दुपारीदेखील ते नंदुरबारहून आले होते. सुरूवातीला त्यांनी अक्कलकुवा येथून वसुली केली होती. त्यानंतर हे व्यापारी आपल्या गाडीने तळोद्यात आल्यानंतर तळोद्यातील व्यापा:यांकडून वसुली केली. साधारण चार लाख रूपयांची वसुली या व्यापा:यांनी केल्यानंतर ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तळोद्याहून निघाले होते. सदर व्यापा:यांची गाडी आमलाडच्या पुढे लावून गाडी थांबविली. त्यानंतर दबा धरून बसलेले 10 त 12 जण गाडीजवळ आलेत. त्यातील काहींजवळ धा:या, कोयता, तलावरील अशी धारधार शस्त्रे  होती. काहींनी ही धारधार शस्त्रांचा धाक व्यापा:यांना दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग एकाने हिसकावून घेतली. काहींनी मिरचीची पूडदेखील व्यापा:यांच्या डोळ्यात फेकली होती. गाडीचालकावर तलवारीचा वार केल्यामुळे त्याच्या मांडीवर घाव बसून जखमी झाला आहे. एका व्यापा:याच्या गळ्यातील चैन, हातातील ब्रासलेटदेखील हिसाकावून घेतले. रोकड पाच लाख व सोन्याचे वस्तू मिळून साधारण सहा लाखांचा ऐवज या लुटारूंनी लूटून नेल्याचे या व्यापा:यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या लुटारूंनी गाडीवरही दगड फेक केल्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या आहेत.या रस्ता लुटीप्रकरणी व्यापा:यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. तत्पूर्वी हे लुटारू तेथून पसार झाले होते. याबाबत व्यापा:यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा र्पयत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मेढे यांनी स्थानिक पोलीस अधिका:यांसह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. व्यापा:यांना लुटण्याची घटना शहरातील व्यापा:यांच्या कर्णोपकर्णी गेल्यानंतर व्यापा:यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. उपविभागीय पोलीस अधिका:यांकडे त्यांनी साकडे घालत अशा सातत्याने घडत असणा:या रस्ता लुटीच्या घटनांवर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. कारण महिनाभरात रस्ता लुटीच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. परंतु लुटारूंचा अद्यापही ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यापा:यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.