शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे अवैध वाळू वाहतुकीचे चार डंपर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:45 IST

महसूल विभागाची कारवाई : तीन पथकांची नेमणूक असताना राजरोस वाहतूक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  अवैधरित्या वाळूची  वाहतूक करणारे चार डंपर महसूल विभागाने जप्त केले आहेत. चालक-मालक संघटनेच्या पदाधिका:यांनी वाळूची वाहतूक होत असल्याचे महसूल विभागाच्या कर्मचा:यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार प्रकाशा गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले डंपर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.सविस्तर वृत्त असे की, वाळूचा उपसा करणे, साठवणूक करण्यावर राज्य शासनाची बंदी आहे. या परिसरात वाळूचे ठेकेही देण्यात आलेले नाहीत. तरीही प्रकाशा येथून वाळूची बेसुमार वाहतूक केली जाते. ही वाळू येते कुठून याचा शोध            घेणे गरजेचे आहे. शासनाचे कडक धोरण असतानाही रात्री-अपरात्री वाळू वाहतूक होत आहे. महसूल विभागाने पथक नेमले असून मात्र या पथकाला ही वाहने दिसत नाहीत. चालक-मालक या संघटनेच्या पदाधिका:यांनी अवैध वाळू वाहतूक करणारी             वाहने प्रकाशा हद्दीतून जात           असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिले. रविवारी प्रकाशा येथे ज्या पथकाला नेमण्यात आले होते ते पथक नेमणुकीच्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे चालक-मालक संघटनेच्या पदाधिका:यांनी मंडळ अधिकारी बी.ओ. पाटील व तलाठी जिजाबराव पाटील            यांच्याशी थेट संपर्क करून घटनास्थळी बोलावले. ते घटनास्थळी आल्यानंतर चारही वाळूने भरलेले           डंपर  (क्रमांक आर.जे.23  जीबी- 4697, आर.जे.23 जीबी-4698, आर.जे.24 जीए- 2277 व एम.एच.39 एडी- 0185) प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राच्या आवारात जमा करण्यात आले. या वाहनांची तपशीलवार माहिती घेऊन दंडात्मक कारवाई करण्याचा आग्रह या पदाधिका:यांनी धरला. त्यासोबतच गावालगत छोटूलाल पुरुषोत्तम पाटील यांच्या बिनशेती गट नं.98/1 या जागेत वाळूचा अवैध साठा असल्याचेही या पदाधिका:यांनी निदर्शनास आणून दिले. त्याठिकाणी शेकडो ब्रास वाळूचा साठा दिसून आला. शासनाच्या नवीन नियमानुसार वाळूचा साठा करणे गुन्हा आहे. त्यामुळे या साठय़ाबाबत लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. हा वाळू साठा एका खाजगी कंपनीने साठविल्याचे समजते.गुजरात राज्यात वाळू उपसा  करणे किंवा वाहतूक महसूल विभागाच्या आधीन राहून केली जाते. मात्र विविध क्लृप्त्या लढवून रात्रीच्यावेळी वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची          चर्चा आहे. महसूल विभागाने तीन पथकांची नेमणूक केलेली असताना अवैधपणे वाळूची वाहतूक का होते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री वाळूने भरलेल्या जप्त केलेल्या चार डंपरवर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई होणार आहे.