शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

50 लाखाच्या घरफोडीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:53 IST

शहाद्यातील घटना : मध्यप्रदेश आणि शहाद्यातून घेतले ताब्यात

शहादा : शहरातील प्रशांत स्विट सेंटर येथे 2015 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून तीन तर शहाद्यातील एका व्यापा:यास अटक केली आह़े या प्रकरणात तीन संशयीतांना ऑगस्ट 2015 मध्येच अटक झाली होती़  20 फेब्रुवारी 2015 रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रशांत स्विट सेंटर या दुकानात चोरटय़ांनी भर दिवसा चोरी करुन दिड किलो सोने, दोन किलो चांदी आणि  आठ लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे 50 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता़ घटना घडल्याच्या तीन महिन्यानंतर पोलीसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 15 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता़ परंतू त्यानंतर  या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होत नसल्याने फिर्यादीने पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांपयर्ंत सात तक्रारी केल्या होत्या़ तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक छोरींग दोरजे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होत़़े दोज्रे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील यांना आदेश दिल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ याप्रकरणी चार महिन्यापासून तपास सुरु होता़ पोलीसांकडून ऑगस्ट 2015 मध्ये गुन्ह्यातील संशयित असलेल्या ईश्वर उर्फ नागेश उत्तम ठाकरे रा़ सालदारनगर, पिन्या उर्फ संदीप चंद्रसिंग पवार रा़ डोंगरगाव रोड व लिंबा नथ्थू गुरव रा़ वृंदावननगर  या तिघांना अटक करण्यात आली होती़ चौकशीदरम्यान तिघांनी सोने व दोन किलो चांदी, मोटार सायकल, फ्रिज असा 15 लाख 37 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ आधी अटक केलेल्या संशयितांचे जाबजबाब, दागिने कोणाला विकले, कोणाकडून हस्तगत केले याची माहिती जाणून घेतल्यानंतर उर्वरित चौघांना ताब्यात घेण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली़ सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पानसेमल जि़ बडवानी येथून लिलाधर मोहनलाल सोनी, प्रकाश हिरालाल सोनी व कमलेश धन्नालाल जैन तर शहादा शहरातून सुमित सोनी या चौघांना ताब्यात घेण्यात आल़े या चोरीतील 28 लाख 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल अद्याप जप्त करणे बाकी असून कारवाईची प्रतिक्षा आह़े