शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 27 रोजी विकास कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जल मल निस:रण प्रकल्पाचे लोकार्पण 27 रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी माँ-बेटी गार्डने भुमिपूजन देखील होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात बोलतांना आमदार चंद्रकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जल मल निस:रण प्रकल्पाचे लोकार्पण 27 रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी माँ-बेटी गार्डने भुमिपूजन देखील होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्व.बटेसिंह रघुवंशी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण 27 रोजी सकाळी 11 वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, खासदार राजीव सातव, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार रोहिदास पाटील, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार रजनी पाटील, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजीराव दहिते, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंह पाडवी, आमदार आसिफ शेख, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आमदार सुनील गामित आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यापूर्वी सकाळी दहा वाजता पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नळवा शिवारातील जल मल निस:रण प्रकल्पाचा शुभारंभ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.24 तास पाण्यासाठी नियोजनशहराला 24 बाय सात योजनेअंतर्गत 24 तास पाणी पुरवठय़ासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासाठी कन्स्लटंट कंपनीला नेमण्यात आले असून सहा महिन्यात ते प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करतील अशी माहितीही आमदार रघुवंशी यांनी दिली. योजनेअंतर्गत बहुतेक आराखडा आधीच तयार आहे. त्यामुळे फारसे काम करण्याची गरज राहणार नाही. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला केवळ दोन प्रभागात ही योजना सुरू केली जाईल. वर्षभर तेथे देखरेख करून योजना यशस्वी झाल्यास संपुर्ण शहरात ती राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मात्र मिटर बसविण्यात येणार आहे.शहरात शहरी ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत दोन दवाखाने बांधून तयार आहेत. पदांची भरती झाल्यास 1 फेब्रुवारीपासून ते देखील सुरू होतील. या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदभरतीचा अधिकार आता देण्यात आला आहे.ट्रक टर्मिनस देखील 26 जानेवारीपासून कार्यान्वीत केले जाणार आहे. जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेर्पयत शहरात प्रवेश बंदीची मागणी प्रशासनाकडे पालिकेने केली आहे. परंतु प्रशासनाने अद्याप अध्यादेश काढला नसल्याचेही आमदार रघुवंशी यांनी सांगितले.