शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारण्यासाठी वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:28 IST

प्रशासनाचा उपक्रम : जिल्ह्यात एक हजार 800 बंधारे बांधणार; तळोद्यात टाकळी येथे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील वाहणा:या नदी, नाल्यांवर संपूर्ण जिल्ह्यातून साधारण एक हजार 800 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान तळोदा तालुक्यातील असे शंभर बंधारे बांधण्यात येणार असून, त्याची सुरूवातही टाकळी येथे महसूल प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. हे बंधारे शासनाच्या विविध यंत्रणा व गावक:यांच्या मदतीने करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील सहाही तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पजर्न्यमान झाले आहे. त्यामुळे नंदुरबारसह, तळोदा, शहादा व नवापूर या चार तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही नंदुरबार, नवापूर, शहादा हे तीन तालुके गंभीर दुष्काळी म्हणून शासनाने नुकतीच जाहीर केले आहे. तर तळोदा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला आहे. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसा गणिक प्रचंड खालावत चालली आहे. भूजल सव्रेक्षण विभागाने या चार ही तालुक्यामध्ये साधारण दोन-अडीच मीटर पेक्षा जास्त पाण्याची पातळी खाली गेल्याचे 15 दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यानंतरही सातत्याने पातळीत घट निर्माण होत असल्याचे शेतकरी सांगतात. पाण्याच्या या सततच्या घटणा:या पातळीमुळे साहजिकच आतापासूनच शेतक:यांबरोबर सामान्य जनतेमध्येही चिंता वाढली आहे. दुष्काळावर उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाकडून प्रय} केले जात आहे.  एवढेच नव्हे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक हजार 800 वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे बंधारे जेथे नद्या, नाल्याचा प्रवाह आतापावेतो सुरू आहे अशा ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक ग्रामस्थांबरोबरच तालुका महसूल प्रशासन, कृषी विभाग, वनविभाग व पंचायत समिती या चार यंत्रणांची मदत घेतली जात आहे. तळोदा तालुक्यातही येथील महसूल प्रशासनाने शंभर वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे. तसा सव्रेदेखील करण्यात आला आहे. बुधवारी या यंत्रणांच्या कर्मचा:यांनी स्थानिक गावक:यांच्या सहकार्याने टाकळी गावाजवळील नदीवर कच्चा वनराई बंधारा बांधण्यात आला. दिवसभर गावक:यांनी व कर्मचा:यांनी श्रमदान केले होते. स्वत: अधिकारीही गावक:यांबरोबर श्रमदान करीत असल्यामुळे गावकरीही भारावले होते. निदान या वनराई बंधा:यांमुळे तरी सतत खोल-खोल जाणारी परिसरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसून बंधा:यांचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतल्याने ग्रामीण भागातून अधिका:यांचे कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमात गावक:यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.