शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

परदेशी पक्ष्यांचा शहाद्यात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:13 PM

ईश्वर पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समुद्रापलीकडे असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून माय ग्रेटर कॅटल ग्रेड हा स्थलांतरित ...

ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : समुद्रापलीकडे असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून माय ग्रेटर कॅटल ग्रेड हा स्थलांतरित पक्षी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मुक्कामाला आलेले आहेत. स्थलांतरीत पक्षी हे या भागात पिल्लांना जन्मास घालून पिल्लांसोबत आलेल्या ठिकाणी परत जातात.शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे हे गेल्या नऊ वषार्पासून पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धन करण्याचे काम करीत आहेत. सपकाळे हे शहादा येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात असलेल्या जागेत पक्षीमित्रांसाठी घरटे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, त्यांना लागणारे अन्नधान्य याची सोय केली आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून दक्षिण आफ्रिकेतील समुद्रकिना:यालगत माय ग्रेटर कॅटल ग्रेड हा पक्षी उन्हाळ्याच्या दिवसात भारतात येतो. सुमारे 30 ते 32 हजार किलोमीटर अंतर कापून हा पिलांना जन्म घालण्याकरिता भारतात येतो. 40 ते 50 नर आणि मादी पिल्लांच्या जोडपींनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या लिंबांच्या दोन झाडांवर गेल्या दोन महिन्यापासून आपले बस्तान मांडले आहे. हे पक्षी माणसांची  कमी वर्दळ परंतु सुरक्षितता असलेल्या मनुष्यवस्तीजवळ काही दिवस  मुक्कामाला थांबतात. बगळा वर्णीय असलेले कॅटल ए ग्रेड हे पक्षी समुद्रालगत मुक्कामाला राहत असल्याने  भरती-ओहोटी, चक्रीवादळ  यापासून सुरक्षित  राहावे म्हणून स्थलांतर  करतात. हे पक्षी सुरक्षित जागेवर थांबल्यानंतर नर-मादींचे मिलन होऊन अंडी दिल्यानंतर पिल्लांना जन्म घालतात. सुमारे चार पिल्ले एकावेळेस जन्माला घालतात. जन्माला घातलेल्या पिल्लांपैकी सक्षम असलेल्या पिल्लांना पावसाळ्याच्या 15 दिवस अगोदर पक्षी परत समुद्रकाठी आपल्या स्थळी परततात. पक्षीमित्र व उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षापासून पक्ष्यांबद्दल माहिती घेत पक्ष्यांनी आपल्या परिसरात रहावे, हिंडावे हा त्यामागील मुख्य उद्देश  आहे. माणसांच्या सुरक्षेसोबतच पक्षी, प्राणी, कीटकनाशके यांची सुरक्षितता करण्यासाठी पक्षीमित्र संघटना स्थापन केली आहे. गेल्या नऊ वर्षात विविध पोलीस मुख्यालय कार्यालयाच्या आवारात पक्ष्यांसाठी घरटी, पिण्याची पाण्याची व्यवस्था अशा सुविधा केलेल्या आहेत. निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी पक्षी, प्राणी, कीटक, जीवजंतू  हे सर्व जगणे आवश्यक आहे. पक्ष्यांना अन्न म्हणून किराणा दुकानात दिवसभरात जमिनीवर पडलेले कडधान्य गोळा करून ते देण्यात येते. तसेच कृत्रिम पाणवठाही तयार करण्यात आला आहे.