लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. यात शहादा तालुक्यातील दोन तर तळोदा, नवापूर व धडगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. चार पुरुष व एक महिला त्यात आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मृतांची संख्या देखील २०० पर्यंत पोहचली आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना २६ जानेवारी रोजी घडली. मृतांमध्ये शहादा तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. त्यात ८० व ८२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष, तळोदा तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुष तर धडगाव तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या आता २०० पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद ही नंदुरबार तालुक्यात ७४, शहादा तालुक्यात ७१ इतकी झाली आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात २९, नवापूर तालुक्यात १८, अक्कलकुवा तालुक्यात चार, धडगाव तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे.
कोरोनाबाधीत पाच जणांचा मंगळवारी झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:31 IST