शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखाचे खैर जातीचे लाकूड व ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : खैर जातीचे लाकूड भरून अक्कलकुवाकडे जाणारा ट्रक येथील वनउपज तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पकडून त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : खैर जातीचे लाकूड भरून अक्कलकुवाकडे जाणारा ट्रक येथील वनउपज तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पकडून त्यातील पाच लाखाचे लाकूड व ट्रक वनविभागाने ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक (क्रमांक एम.एच.१८ एए -०११५) पांढरकवडा वनक्षेत्रातील उमरी वनहद्दीतून कोरेगाव येथून अंदाजे पाच लाखाचे खैर जातीचे लाकूड घेऊन परवान्यासह १४ जुलै रोजी निघाला होता. हा ट्रक १५ जुलै रोजी तळोदा येथील उपउपज तपासणी नाक्याजवळ आला असता तेथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना संशय आला. या अधिकाºयांनी पुढील चौकशी केल्यानंतर ट्रकसह पाच लाखाचे खैर जातीचे लाकूड जमा केले. वाहन चालक नशीब अलीखॉ (रा.रिसोड, जि.वाशिम) याच्याविरोधात वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवाना संशयास्पद
कोरेगाव येथून ट्रकमध्ये आणलेल्या लाकडाचा परवाना काढलेला असल्याचे ट्रक चालकाने सांगितले असले तरी जेव्हा त्याची चौकशी वनविभागाच्या अधिकाºयांनी केली तेव्हा त्यात संशय आला आहे. त्याबाबत पांढरकवडा येथील वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून येथील अधिकारी माहिती घेत असल्याचे प्रभारी वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार यांनी सांगितले. लाकडाने भरलेला हा ट्रक सध्या वनविभागाच्या कार्यालयात असून लाकडाचे मोजमापदेखील केले जात आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक सुरेश केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चंद्रकांत कासार हे करीत आहेत. दरम्यान, तळोदा वनविभागाच्या या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.