शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

गुजरातच्या बेपर्वाईने महाराष्ट्राच्या पाच लाख कोंबड्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:11 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तत्काळ दखल ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत गुजरात प्रशासनाला सतर्क करुनही त्याची तत्काळ दखल न घेतल्याने आता त्याचा संभाव्य धोक्यापासून महाराष्ट्राला सतर्क राहावे लागणार आहे. सीमेलगतच्या पाच पाेल्ट्रींचा अहवाल निगेटीव्ह आला असला तरी गुजरातच्या हद्दीतील पोल्ट्रींचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सुमारे पाच लाख कोंबड्यांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत माेठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय चालतो. या दोन्ही राज्यात तीन किलोमीटरच्या परिसरात ३० पेक्षाही अधिक पोल्ट्री असून, त्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील २७ आहेत. तर गुजरातच्या हद्दीत तीन आहे. पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र प्रशासन सतर्क झाले व उपाययोजना सुरू केल्या. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचे अहवाल पॉझिटीव्ह येताच तत्काळ कोंबड्या व अंडी शास्त्राेक्त पद्धतीने नष्ट करण्यास सुरूवात केली. त्यासाठी विविध जिल्ह्यातील सुमारे ३०० पथक कार्यरत होते. हा अहवाल ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने शेजारील डांग व तापी जिल्हा प्रशासनाला कळवून सतर्कतेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गुजरात प्रशासनाने सुरूवातीला बेपर्वाईची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर गुजरातमधील पोल्ट्री फार्ममधून पक्षांची ने-आण होवू नये याची खबरदारी घेण्यासाठी तेथील पोल्ट्रीवर महाराष्ट्राचाच पोलीस बंदोबस्ताला ठेवण्यात आले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुजरात प्रशासनाला जाग आली आणि तेथील पोल्ट्रीवर गुजरातचे पोलीस बंदोबस्ताला ठेवले. त्यानंतर तपासणीसाठी नमुनेही घेण्यात आले. इकडे महाराष्ट्रातील २२ पोल्ट्रीतील अहवाल पॉझीटिव्ह आल्याने तेथील सुमारे पावणेसहा लाख कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. उर्वरित पाच पोल्ट्रींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल १० दिवसांपासून अहोरात्र काम करणाऱ्या यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. पक्षांची किलिंग थांबविण्यात आली आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांनाही विश्रांती देण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील किलिंग थांबवताच गुजरातमधील ‘त्या’ पोल्ट्रींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे तेथील पोल्ट्रीत एच ५, एन १ हा मनुष्यालाही धोका पोहचवू शकणाऱ्या विषाणू निष्पन्न झाला. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडून विश्रांतीचा मुडमध्ये आलेल्या महाराष्ट्र प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कारण गुजरातमधील तो पोल्ट्री फार्म हाकेच्या अंतरावरच असून, ज्या पाच पोल्ट्रीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथील किलिंग थांबविण्यात आले होते. त्या पोल्ट्री जवळच असल्याने तेथील सुमारे पाच लाख कोंबड्यांना पुन्हा गुजरातच्या या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पुन्हा खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.