शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात पशुधनासाठी पाच दवाखान्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाळीव पशुंची योग्य सुश्रुषा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाच नवीन दवाखाने निर्माण करण्याचा निर्णय घेतला आह़े यातील चार दवाखाने हे स्थलांतरित तर एक दवाखाना हा नव्याने तयार होणार आह़े शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि शहादा तालुका पशुवैद्यकीय श्रेणी एकचे दवाखाने स्थलांतरित करण्यावर चर्चा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाळीव पशुंची योग्य सुश्रुषा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाच नवीन दवाखाने निर्माण करण्याचा निर्णय घेतला आह़े यातील चार दवाखाने हे स्थलांतरित तर एक दवाखाना हा नव्याने तयार होणार आह़े शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि शहादा तालुका पशुवैद्यकीय श्रेणी एकचे दवाखाने स्थलांतरित करण्यावर चर्चा करण्यात आली़ शहरी भागात असलेल्या या दवाखान्यांचा लाभ ग्रामीण भागात अधिक झाला पाहिजे, या विचारातून हे चार दवाखाने ग्रामीण भागात स्थलांतरित होणार आह़े यासाठी पदांना मजूंरी, खर्च याचे नियोजन जिल्हा परिषदेने करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी शासनाकडे प्रस्तावही देण्यात आला आह़े जिल्ह्यात काही वर्षापूर्वी लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या स्थापनेमुळे जिल्हा परिषदअंतर्गत चालवल्या जाणा:या पशुवैद्यकीय श्रेणी एकचे दवाखाने ओस पडत होत़े याठिकाणी कर्मचा:यांच्या नियुक्त्या करूनही उपयोग होत नसल्याने पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागात सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला असून त्यांतर्गत नव्या दवाखान्यांची निर्मिती आणि जुन्या दवाखान्यांचे स्थलांतर अशी मोहिम सुरू केली आह़े यात गेल्या काही महिन्यांपूर्वीच नंदुरबार येथील श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना हा रनाळे ता़ नंदुरबार येथे स्थलांतरित करण्यात आला होता़ नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 29 हजार 629 दुधाळ गाई व म्हशी आहेत़ सोबत साडेचार लाख शेळ्या, दीड लाख बैल यासह इतर पाळीव जनावरे अशी एकूण 9 लाख जनावरे आहेत़ या पाळीव जनावरांवर सातत्याने उपचार आणि लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मोहिमा आखण्यात येतात़ यात पशुधन विकास अधिकारी आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदांमुळे अडचण निर्माण होत़ेअधिकारी आणि सहायक यांच्या पदासह परिचर आणि रूग्णसेवक या रिक्त पदांची भरती करण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आह़े वर्ग तीन आणि वर्ग चारची पदभरती गेल्या काही वर्षात न झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचारीच नसल्याचे सांगण्यात आले आह़े यामुळे संबधित विभागाच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले आह़े   पाच तालुका मुख्यालयातील श्रेणी एकचे दवाखाने स्थलांरित झाल्यानंतर स्थानिक  ग्रामपंचायतींच्या मालकीच्या इमारतींमध्ये सुरू करण्यात येणार आह़े याठिकाणी काही दिवस कामकाज करून या दवाखान्यांसाठी शासनाकडून त्या-त्या गावात इमारती उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या इमारतींमुळे पाळीव गुरांवर दीर्घ उपचार आणि लसीकरण सोपे होणार आह़े