लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुविधांच्या दृष्टीने दुर्गम भागाला नेहमीच साप} वागणूक दिली जात आहे. दूरसंचारच्या अनियमित सेवेनंतर आता मोलगी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोलगी भागातील संपूर्ण गावे मागील पाच दिवसांपासून अंधारात असल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडली आहे. दुर्गम भागात शासकीय योजना व सुविधा पोहोचत नाही. पोहोचल्यास तरी त्यांची योग्य व नेमकी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याच्या तक्रारी नेहमीच करण्यात येत असते. दोन वर्षापासून दूरसंचारमार्फत तेथील ग्राहकांना नियमित सेवा मिळत नाही. याबाबत दूरसंचार विभागाच्या अधिका:यांना विचारले असता वीज वितरणमार्फत योग्य दाबाचा विद्युत पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला असून कार्यवाहीची प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा संपली नाही तोच पुन्हा मोलगी येथील सबस्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाली आहे. त्यामुळे मोलगी परिसरातील सर्व गावे गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. सर्व गावांमधी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोलगी सबस्टेशनमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
अक्कलकुवा तालक्यातील भगदरी या गावाच्या सर्वागिण विकासासाठी चार वर्षापूर्वी तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या गावाला दत्तक घेतले होते. परंतु मोलगी येथील वीज वितरणच्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे या परिसरातील गावांपाठोपाठ भगदरी हे गाव देखील अंधारात असल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात आले. त्याशिवाय संस्थानिकांचे गाव म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या तथा राजवाडी होळी पेटणा:या काठी ता.अक्कलकुवा हे गाव देखील सबस्टेशनमधील बिघाडामुळे मागील पाच दिवसांपासून अंधारात आहे. अशी प्रसिद्ध गावेही सुविधांपासून वंचित राहत असल्याने यंत्रणेबाबत शोकांतिका व्यक्त केली जात आहे.