शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

गांधी घराणे प्रचार शुभारंभाला यंदा नंदुरबारात प्रथमच ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:40 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गांधी घराणे आणि नंदुरबारातील आदिवासींचे नाते गेल्या साडेचार दशकांपासून जुळले आहे. ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गांधी घराणे आणि नंदुरबारातील आदिवासींचे नाते गेल्या साडेचार दशकांपासून जुळले आहे. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुुभारंभ नंदुरबारपासून करण्याची प्रथाच जणू रुढ झाली होती. यावर्षी मात्र या घराण्यातील नव्या वारसदार प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेशाची सुरुवात नंदुरबारपासूनच व्हावी असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्याला मात्र या वेळी ‘ब्रेक’ मिळाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा या जिल्ह्यातील आदिवासींवर मोठा प्रभाव होता. त्यामुळे १९७६ नंतर इंदिरा गांधी यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासूनच करीत असे. त्यांनी दिलेला ‘गरीबी हटाव’चा नारा येथील आदिवासींना चांगलाच भावल्याने त्याचा प्रभाव आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत जाणवत होता. त्यांच्यानंतर स्व.राजीव गांधी यांच्या प्रचारसभाही चांगल्याच गाजल्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांची पहिली सभा कुठे व्हावी याबाबत पक्षांतर्गत अनेक चर्चेनंतर नंदुरबारचे नाव निश्चित करण्यात आले. त्यावेळी झालेली नंदुरबारची त्यांची सभा विक्रमी ठरली.नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. गेल्यावेळी प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्या पराभवाचे कारणही काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सोनिया गांधी यांची नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्याचा परिणाम सांगतात. सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्या सभेला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय जमला होता. पण त्या उपस्थित न राहू शकल्याने निवडणुकीवर परिणाम झाल्याचे काही कार्यकर्ते सांगतात.एकूणच या मतदारसंघात गांधी घराण्याच्या सभांचा मोठा प्रभाव होत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मानणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांची पहिली सभा ही नंदुरबारलाच व्हावी, असा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यासाठी काँग्रेसतर्फे येथील दोन्ही इच्छुक उमेदवार आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी व जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी प्रियंका गांधी यांनी पहिली सभा नंदुरबारला घ्यावी, असा आग्रह केला होता. त्याबाबत पक्षाकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने दिले. तसेच ई-मेलही पाठविले होते. मात्र प्रियंका गांधींच्या प्रचाराला सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. ‘नाव पे चर्चा’ हा उपक्रम त्यांचा सध्या सुरू आहे. तो अधिक चर्चेतही आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीसा हिरमोड आला असला तरी त्यांची सभा या निवडणूक काळात नंदुरबारला होईल, असा आशावादही लागून आहे.