शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी जात पडताळणी अभिप्रायाला हिवाळी अधिवेशनाचा ‘खोडा’, मंत्रिमंडळ उपसमितीची झाली पहिली बैठक

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 1, 2017 12:15 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमातीसाठीच्या नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आह़े समितीची पहिली बैठक मुंबई येथे मंगळवारी घेण्यात आली़ समितीने एका महिन्याच्या आत अभिप्राय देणे अपेक्षीत आह़े परंतु हिवाळी अधिवेशनामुळे या अभिप्रायाचा खोळंबा होणार आह़े11 डिसेंबर ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमातीसाठीच्या नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आह़े समितीची पहिली बैठक मुंबई येथे मंगळवारी घेण्यात आली़ समितीने एका महिन्याच्या आत अभिप्राय देणे अपेक्षीत आह़े परंतु हिवाळी अधिवेशनामुळे या अभिप्रायाचा खोळंबा होणार आह़े11 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आह़े त्यानंतरच पुढील बैठका होणार असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे एका महिन्यांच्या आत अभिप्राय देणे आवश्यक असताना हिवाळी अधिवशेनामुळे यास उशिर होणार आह़े रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम 2012 मध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाने सहमती दिली आह़े याच धर्तीवर  अनुसूचित जमातीसाठीच्या नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यी समिती नेमण्यात आली आह़ेहिवाळी अधिवेशनात होणार चर्चा. 11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आह़े त्यामुळे  या अधिवेशनात अनुसूचीत जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचे  दिसून येत आह़े राज्यभरात अनुसूचीत जमातीची हजारो प्रकरणे प्रलंबित आह़े त्यामुळे या उपसमितीच्या अभिप्रयावर सर्वाचे लक्ष लागून आह़ेबुधवारी झालेल्या पहिल्या बैठकीत समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिका:यांकडून प्रलंबि प्रकरणांचा आढावा घेतला अनुसूचीत जमातीची एकूण किती प्रकरणे पेंडींग आहेत, आता र्पयत किती निकाली निघाली, रक्तनाते संबंधांवर आधारीत किती प्रकरणे प्रलंबित आहेत आदींची माहिती घेतली़ अनुसूचीत जमातींच्या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयाकडून वेळावेळी आलेल्या निकालांचाही तपशीलवार आढावा घेतला़ या वेळी राज्याचे महसूलमंत्री व समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की़, मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज पहिली बैठक झाली़ या बैठकीत अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीच्या सर्व अधिका:यांकडून विभागनिहाय आढावा घेण्यात आला़ पुढील बैठक हिवाळी अधिवेशनानंतर होईल़