लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : अवघ्या भारताच्या विकासात भर टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामाचा ठेका घेणारा हे काम करण्यास असमर्थ ठरला. त्यामुळे महार्गाचे काम दुस:या ठेकेदाराला देण्यात आले आहेत. परंतु या नव्या ठेकेदारामार्फत अद्याप कामच सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे चौपदरीकरणासह रस्त्याच्या डागडुजीची कामेही रखडली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त भावना उमटू लागल्या आहे. धुळे-सुरत या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची तरतुद अनेक वर्षापूर्वी करण्यात आली होती. परंतु शेतक:यांना जागेचा योग्य मोबदला दिला जात नव्हता, त्यामुळे हा मुद्दा काही वर्षे रेंगाळत राहिला. शेतक:यांनी नेहमीच नाराजी दाखवत योग्य मोबदला पदरी पाडून घेतला. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. चौपदरीकरणासह काम सुरू असताना रस्त्याची होणारी दुरवस्था देखील दूर करणे असे दुहेरी काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणमार्फत एकदाच हाती घेण्यात आली. या मार्गावरील फागणे ता.धुळे ते बेडकीर्पयत रस्ता कामाचा ठेका मे.फागणे सोनगढ एक्स्प्रेस वे लि. या कंपनीला देण्यात आले होते. ठेकदाराने चौपदरीकरणचे काम सुरुही केले. शिवाय करारानुसार रस्ता डागडुजीची कामेही या ठेकेदाराने हाती घेतली. परंतु या ठेकेदाराला आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हे काम करण्यास तो असमर्थ ठरला. ठेकेदार काम करण्यास असमर्थ असल्याचे राजमार्ग प्राधिकरणतर्फे मुख्यालयाकडे कळविण्यात आले. त्यावर तातडीने निर्णय घेत प्राधिकरणच्या मुख्यालयाकडून 2 ऑगस्ट 2019 रोजी पत्र काढून ठेकेदारासोबत झालेला करार रद्द करण्यात आला. त्यामुळे कामात काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले, हे अडथळे दूर करण्यासाठी ठेकेदाराची निवड करीत कामाला गती देणे आवश्यक बने होते. त्यानुसार पुढील काम तातडीने सुरू करण्यासाठी मे.शिवम कंन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत नवीन करार करीत त्यांच्याकडे महामार्ग चौपदरीकरणच्या कामांसह डागडुजीचीही कामे सोपविण्यात आली आहे. परंतु नवीन ठेकेदाराने चौपदरीकरण व डागडुजीच्या कामांना अद्याप सुरुवातच केली नाही. त्यामुळे महामार्गावरी संपूर्ण काम बंद पडले आहे. अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे महामार्गाची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावर होणा:या वाहतुकीला मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या आहे. सुरळीत वाहतुकीसाठी महामार्गाची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदारच दाखल झाला नसल्याने वाहनधारक व प्रवाशांनी वाहतुक सुरू ठेवली आहे. ठेकेदारामार्फत कामाला सुरुवात करण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
सुजलाम-सुफलाम देश निर्मितीचे स्वपAे रंगवत धुळे-सुरत महामार्ग चौपदरीकरणची तरतुद करण्यात आली. त्यानुसार कामाला सरुवातही करण्यात आली, परंतु बेडकी ता.नवापूर ते फागणे ता.धुळे र्पयतच्या कामासाठी योग्य ठेकेदारच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महामार्गाच्या रुपात धावत्या विकासाला ब्रेक लागला आहे.डागडुजीची कामे होत नसतानाही धुळे महामार्ग प्राधिकरणच्या धुळे कार्यालयामार्फत कामे सुरू असल्याचे पत्र तक्रारदारांना देण्यात आले आहेत. परंतु प्रवासी व वाहनधारकांकडून प्राधिकरणच्या या पत्राचे खंडण करण्यात येत आहे.