नंदुरबार : अंगणवाडी सेविकेच्या घराला आग लावून नुकसान करणा:या चौघांना शहादा न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली़ ऑक्टोबर 2015 मध्ये ही घटना घडली होती़ पांढरामातीचा जांभापाणीपाडा ता़ अक्कलकुवा येथील अंगणवाडी सेविका इंदिराबाई रामसिंग पाडवी यांना किसन ईरमा वळवी, नारसिंग रोडत्या वसावे, रागा खात्र्या वळवी, मुरजी खात्र्या वळवी हे नेहमी दमदाटी करत होत़े किसन वळवी याची पत्नी प्रेमलता अंगणवाडी सेविका असल्याने तिची बदली जांभापाणीपाडा येथे करण्यासाठी तो प्रयत्नशील होता़ परंतू तेथे इंदिराबाई यांची बदली झाली होती़ यातून त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये इंदिराबाई व त्यांचे पती रामसिंग यांना मारहाण केली होती़ यामुळे घाबरुन पाडवी कुटूंबिय काठी येथील मूळगावी निघून गेल्या होत्या़ जांभापाणीपाडा येथे त्यांचा 13 वर्षीय मुलगा विकेश हा आजोबांसोबत राहून घराची देखभाल करत होता़ दरम्यान इंदिराबाई यांचे राहते घर जळाल्याची घटना घडली होती़ हे घर किसन वळवीसह तिघांली जाळल्याचे विकेश पाडवी याने पाहिले होत़े याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात आगीचा गुन्हा दाखल होता़ आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले होत़े याप्रकरणी शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी़बी़नायकवाड यांच्या न्यायालयात गुन्हा शाबीत झाल्याने किसन वळवी, नारसिंग, वसावे, रागा वळवी, मुरजी वळवी या चौघांना सात वर्ष कारावास व प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सी़पी़गांगुर्डे यांनी सादर केल़े सरकार पक्षातर्फे अॅड़ यशवंतराव मोरे यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रामलाल साठे व पोलीस कॉन्स्टेबल रवि पवार यांनी काम पाहिल़े
घराला आग लावणा:या चौघांना सात वर्ष शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:01 IST