शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इंधनावरील सेसचे भूत मानगुटीवर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 12:34 IST

नंदुरबार : शहरातील दोन्ही उड्डाणपुलांसाठीचा खर्च भरून निघण्यासाठी रस्ते विकास महामंडळातर्फे शहरातून विक्री होणा:या पेट्रोल व डिङोलवरील सेसला 2019 ...

नंदुरबार : शहरातील दोन्ही उड्डाणपुलांसाठीचा खर्च भरून निघण्यासाठी रस्ते विकास महामंडळातर्फे शहरातून विक्री होणा:या पेट्रोल व डिङोलवरील सेसला 2019 र्पयत मुदतवाढ गेल्याच वर्षी शासनाने दिली होती. परंतु दोन  दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या सेस नागपूर शहरासाठी रद्द करण्यात आल्याने आता नंदुरबारकरांवरील हा अधीभार देखील रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, होणारी ही लूट थांबावावी अन्यथा आंदोलनाचा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी दिला आहे.शहरातील व शहराबाहेरील अशा दोन उड्डाणपुलांना शासनाने ऑगस्ट 2003 मध्ये मंजुरी दिली होती. शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत त्यावेळ 16 कोटी 43 लाख रुपयांचा अंदाजीत खर्च गृहीत धरण्यात आला होता. कालांतराने बांधकामासाठी वेळ लागल्याने अंदाजीत रक्कम 22 कोटींपेक्षा अधीक गेली. त्यात शहरातील रेल्वे उड्डाणपूल, शहराबाहेरील उड्डाणपूल, पालिका हद्दीतील रस्ते सुधारणा आणि सार्वजनिक बांधकाम हद्दीतील रस्ते सुधारणा यांचा त्यात समावेश होता.राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑगस्ट 2003 मध्ये जेंव्हा या प्रकल्पाला मंजुरी दिली होती त्यावेळी नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाच्या बांधकामाचा अंदाजीत खर्च सात कोटी 72 लाख रुपये, शहराबाहेरील उड्डाणपुलाचा खर्च पाच कोटी 36 लाख रुपये होता. पालिका हद्दीतील 13.50 किलोमिटर रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्यांच्या सुधारणासाठी दोन कोटी 19 लाख आणि पथकर वसुली इमारत आणि रस्ता बांधकामासाठी एक कोटी 16 लाख असा एकुण 16 कोटी 43 लाखांचा अंदाजीत आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात दोन्ही उड्डाणपुलांचे काम पुर्ण होणे आणि ते कार्यान्वीत होण्यासाठी 2008 साल उजाडल्याने या प्रकल्पाची किंमत 22 कोटींपेक्षा अधीक गेली होती.शासनाने या प्रकल्पांना मंजुरी दिली होती त्यावेळीच अध्यादेशामध्ये कर्ज वसुली पुर्ण होत नाही तोर्पयत नंदुरबार शहराच्या हद्दीतील सर्व पेट्रोल व डिङोल पंपांवरून विक्री होणा:या पेट्रोल व डिङोलच्या किंमतीवर लिटरमागे पेट्रोलला पूर्वी एक रुपया होता आता 48 पैसे आणि डिङोलला पूर्वी 90 पैसे आणि आता 1.57 रुपये अधिभार लावला जात आहे.  अर्थात हा दर टक्केवारीनुसार अनुक्रमे एक व तीन टक्का असा होता. या बाबीला आज 10 वर्ष झाले आहेत. 10 वर्षात किती अधिभार वसुल झाला याचा हिशोब कुणाकडेही नाही.अधिभाराचे भूत शहरवासीयांच्या मानगुटीवर आणखी एक वर्ष  राहणार आहे. आधीच्या अध्यादेशानुसार डिसेंबर 2016 र्पयत हा अधिभार   वसुल करण्याचे शासनाने ठरविले होते.परंतु या प्रकल्पांसाठी लागणा:या कर्जाची रक्कम वसुल झालेली नसल्याने राज्याच्या अर्थ विभागाने आणखी  डिसेंबर 2019 र्पयत अधिभार वसुलीचे अध्यादेश गेल्याच वर्षी काढले आहेत. आता नागपूरच्या पाश्र्वभुमीवर रद्दची मागणी होत आहे.